इटलीतील एका मधुमक्षी पालकाने राेमांच आवडणाऱ्या शाैकीन लाेकांसाठी विशेष प्रकारचे एक घर तयार केले आहे.तिथे लाेक निसर्ग आणि मधमाश्यांचे गुंजन ऐकत आपला वेळ घालवू शकतात. या जागेचे नाव ‘वंडर बी अँड बी’ आहे. येथे मधमाश्यांच्या पाेळ्यांना डेकाेरेशन म्हणून लावण्यात आले आहे. या संपूर्ण परिसरात सुमारे 10 लाख मधमाश्या राहतात. लाेक येथे एक रात्र मु्नकाम करण्यासाठी 14 हजार रुपये देऊन येतात.