दुबईमध्ये मध्यपूर्व आशियातील सर्वांत माेठी लायब्ररी ‘राशीद लायब्ररी’चे नुकतेच लाेकार्पण करण्यात आले. ही लायब्ररी 7 मजली असून, त्यात 11 लाख पुस्तकांचा संग्रह आहे. पहिल्या मजल्यावर लहान मुलांसाठी पुस्तके आहेत. याशिवाय या लायब्ररीमध्ये 60 लाख निबंध, 73 हजार म्युझिक नाेट्स, 75 हजार व्हिडिओ, 5 हजार पांडुलिपी हस्तलिखिते आणि वर्तमानपत्रांचे 35 हजार अंक आहेत. या लायब्ररीत 325 वर्षांची जुनी पुस्तकेसुद्धा आहेत. आता या लायब्ररीत आर्टिफिशियल इंटेलिजन्सचाही समावेश करण्यात आला आहे. राेबाेटिक गाइडच्या मदतीने लाेक आपल्या पसंतीची पुस्तके काढून घेतात. या लायब्ररीमध्ये एआय कियाेस्क बसविलेले असून, बटन दाबताच वरच्या शेल्फवरील पुस्तक आपल्या समाेरच्या शेल्फवर आणता येते.