ओशाे - गीता-दर्शन

09 Dec 2022 17:12:35
 

Osho 
 
प्रत्येक नाेकर म्हणताे की, ‘मी मालक आहे’ अन् मालक तर तिथे हजर नाही. त्या घरात माेठं भांडण चालत असतं. घर जुनं पुराणं हाेत जातं, पण मालकच काेणी नाही तर रंग-पाणी, दुरुस्ती वगैरे तरी काेण करणार? ते तर लांबच राहिलं, पण सफाई व्हायची सुद्धा मारामार. एकूण एक नाेकर असे की प्रत्येकाचा व्यवहार असा असताे की, आपण स्वत:च मालक आहेात आणि बाकी सारे आपले नाेकर आहेत. स्वत:पण नाेकरच आहाेत हे प्नक माहिती असतं, पण फुकटचा आव मात्र मालक असल्याचा. बाकीच्यांना पण माहिती असतंच ना की, हाही बेटा मालक नाहीच म्हणून.मग ताे तरी दुसऱ्या एखाद्या नाेकराचं कुठलं ऐकायला? ताे त्याला जाम ठणकाऊन सांगताे, ‘तू एक नाेकर आहेस, जास्त रुबाब नकाे करूस.
 
मला हुकूम करायचा तुला काही एक अधिकार नाही. तू काही मालक नाहीस.’ मग ते घर पडत जातं. भिंती काेसळतात, विटा पडतात. पण बांधकाम दुरुस्ती करणारा काेणीही नाही. कचराही निघत नाही. त्याचे ढीग साचत जातात. पण सगळ्यांचा आव मात्र मालक असल्याचा. आत जवळजवळ आपला आत्मा असाच झाेपलेला असताे, जणू हजर नाहीच.ऐकलाय का आपल्या आत्म्याचा आवाज आपण कधी? हाे, आपण राजकीय पुढारी वगैरे असाल तर ऐकला असेल. म्हणूनच तर मागच्या निवडणुकीच्या वेळी.. सर्व पुढारी आत्म्याचा आवाज ऐकतात. ज्या दिवशी पुढाऱ्यांच्या आत्म्यात आवाज उमटू लागेल, त्यादिवशी जगात काेणीही पापी राहणार नाही.
Powered By Sangraha 9.0