पत्र तिसावे
ज्याप्रमाणे नरकासुराने बंदित टाकलेल्या हजाराे स्त्रिया कृष्णाने साेडवल्या त्याप्रमाणे त्या शेकडाे राजांची मु्नतता करावी व त्यांचे बलिदान थांबवावे असे कृष्णाने ठरवले.ताे भीम व अर्जुन यांना घेऊन मगध देशात गेला व तेथे मल्ल युद्धात भीमाने जरासंधाला ठार मारले.युधिष्ठिराचा राजसूय यज्ञ सुरू झाला. निरनिराळ्या लाेकांच्याकडे कृष्णाच्या सल्ल्याने कामे देण्यात आली.भाेजन व्यवस्थेवर देखरेख करण्याचे काम दु:शासनाकडे हाेते.ब्राह्मणांचा सत्कार करण्याचे काम अश्वत्थामाकडे हाेते.जमाखर्च ठेवण्याचे काम विदुराकडे हाेते. राजे लाेकांच्याकडून नजराणे घेण्याचे काम दुर्याेधनाकडे हाेते. हल्लीच्या भाषेत बाेलायचे म्हणजे स्वागतसमितीचे मुख्य भीष्माचार्य व द्राेणाचार्य हाेते.ज्याला ह्या यज्ञात अग्रपूजेचा मान देण्यात आला त्या कृष्णाने स्वत:कडे काेणते काम घेतले हाेते? अग कृष्णाने खूप लाेकांना माेठे केले, पण स्वत: काेणती पदवी घेतली?
कृष्णाने स्वत:कडे जी पदवी द्वारका नगरी स्थापल्यानंतर घेतली हाेती ती म्हणजे- ‘‘सर्वांचा दास’’ काेणत्याही राजा महाराजापेक्षा ही पदवी माेठी हाेती. ही पदवी ज्याला समजली त्यालाच कृष्णाचे जीवन समजले.सत्तेपेक्षा सेवा माेठी आहे हे कृष्णाच्या जीवनाचे सूत्र आहे.गीता समजून घेण्याकरता तू हे सूत्र हृदयात काेरून ठेव.राजसूय यज्ञात कृष्णाने स्वत:कडे जे काम घेतले ते म्हणजे- निमंत्रितांचे पाय धुणे.राजसूय यज्ञात कृष्णाला अग्रपूजेचा मान दिल्यावर शिशुपाल संतापला, त्याने भरसभेत कृष्णाची खूप निंदा केली.ते असे लक्षात घे की-- कृष्णाने गाेपींशी व्यभिचार केला किंवा आठ बायका असतांना भाेगाची परमावधी म्हणून कृष्णाने आणखी हजाराे स्त्रियांशी लग्न केलेअशा प्रकारची निंदा आज काही विद्वान करतात.
पण- शिशुपालाने असली निंदा केली नाही. जेव्हा विरुद्ध बाजूचा मनुष्य मनसाे्नत निन्दा करू लागताे, तेव्हा साऱ्या वाईट गाेष्टी ताे बाेलून टाकताे.आज काही विद्वान कृष्णाची ज्या बाबतीत निन्दा करतात त्यात थाेडे जरी तथ्य असते तर शिशुपाल कृष्णाची यथेच्छ निंदा करत हाेता पण कृष्ण शांत हाेता.शिशुपालाची आई कृष्णाची आत्या हाेती. त्याने वचन दिले हाेते की तुझ्या पुत्राचे मी शंभर अपराध सहन करीन.शेवटी शिशुपालाने कृष्णास युद्धाचे आव्हान दिले. त्यावेळी शिशुपालाचे शंभर अपराध भरले हाेते.युद्धाचे आव्हान ऐकून कृष्ण उभा राहिला व आपल्या घनगंभीर स्वरात म्हणाला- ‘सज्जनहाे, याच्या मातेला जे मी वचन दिले हाेते त्या वचनातून आता मी मु्नत झालाे आहे’ असे म्हणून कृष्णाने आपल्या सुदर्शन चक्राने शिशुपालाचा वध केला.नंतर द्युताचा प्रसंग आला व पांडवांच्या कपाळी वनवास आला.