गीतेच्या गाभाऱ्यात

08 Dec 2022 14:09:30
 
 
 
 
पत्र तिसावे
 

bhagvatgita 
 
 
कृष्णाच्या या महान कार्यामुळे लाेक इतके माेहून गेले की त्यांनी त्याचे स्मारक करणेचे ठरवले.ज्या दिवशी कृष्णाने नरकासुराला मारले ताे दिवस अश्विन वद्य चतुर्दशीचा हाेता. लाेकांनी ठरवलेताे दिवस म्हणजे नरक वद्य चतुर्दशी. या दिवसापासून लाेकांनी चार दिवस दिवाळी साजरी करावयाची. गाेड गाेड खावयाचे व स्त्रियांच्यावरील संकट दूर झाले म्हणून घराेघरी दिवे लावावयाचे.हा खरा प्रकार समजला म्हणजे साेळा हजार एकशे बायका केल्या म्हणून कृष्णाला जे लाेक नावं ठेवतात, त्यांना आपली चूक समजून येईल व माेठ्या भ्नितभावाने कृष्णाला नमस्कार करून ते म्हणतील - ‘‘कृष्णा, तुझ्यासारखा समाजाेद्धारक जगात आजपर्यंत झाला नाही. तू हाेतास म्हणून त्या स्त्रियांना त्राता मिळाला.तुला शतश:, सहस्त्रश: प्रणाम.’’ महाभारताचा नायक आहे कृष्ण; नायिका आहे द्राैपदी.
 
कृष्णाची व द्राैपदीची प्रथम गाठ केव्हा झाली तुला माहीत आहे? नसेल तर समजून घे.स्वयंवराचा दिवस उजाडला. कृष्ण व बलराम स्वयंवर मंडपात येऊन बसले. महाभारतात कृष्ण आपणास प्रथम दिसताे ताे द्राैपदी स्वयंवराच्या वेळी.स्वयंवराचा पण फार कठीण हाेता. ताे कुणालाही जिंकता आला नाही. जरासंध, शल्य वगैरेनी प्रयत्न केला. त्यांनी धनुष्य हातात घेतले पण ताे अवघड पण त्यांना जिंकता आला नाही.काेणीच पण जिंकत नव्हते. इत्नयात ब्राह्मण समुदायातू एक तरुण पुढे आला व त्याने पाहता पाहता धनुष्यास गुण लावला व मत्स्यभेद करून सर्वांना आश्चर्यचकित करून साेडले.हाच ताे अर्जुन त्या वेळी पांडव ब्राह्मणवेषात एका कुंभाराच्या घरी राहात हाेते. कृष्ण तेथे गेला व कुंतीला नमस्कार करून म्हणाला- ‘‘आत्या, ओळखलेस मला?’’ त्या भाच्याला पाहून कुंतीचा आनंद गगनात मावेना.
 
पांडव म्हणाले- ‘‘आता आम्हाला त्राता भेटला.’’ द्राैपदी कृष्णाला प्रथमच पाहात हाेती. कृष्ण श्याम व त्रिभुवनसुंदर, द्राैपदी श्यामा व त्रिभुवनसुंदरी. कृष्णाला पाहून तिच्या अंत:करणाची काेमल तार छेडली गेली. तिने कृष्णाला नमस्कार केला. कृष्णाने विचारले- ‘‘द्राैपदी, औळखलेस मला?’’ द्राैपदी म्हणाली- ‘‘हाेय, तू माझा जन्माेजन्मीचा भाऊ’’ कृष्ण म्हणाला- ‘‘मी धन्य झालाे द्राैपदी, हा तुझा भाऊ तुला केव्हाही अंतर देणार नाही. तुझ्यासाठी मी वाटेल ते करीन.’’ पुढे पांडवांना निम्मे राज्य मिळाले व आपल्या पराक्रमाने त्यांनी ते खूप वाढवले. मग युधिष्ठिराच्या मनांत राजसूय यज्ञ करावा असे आले. त्याने कृष्णाचा सल्ला घेतला. त्यावेळी जरासंध एेंशी वर्षांचा हाेता. त्याने शेकडाे राजे जिंकून आपल्या कारागृहात टाकले हाेते व पुरुषमेध यज्ञ करून यज्ञ वेदीवर
Powered By Sangraha 9.0