ओशाे - गीता-दर्शन

07 Dec 2022 13:03:49
 

Osho 
कधी ताे इंद्रियांचे म्हणणे मान्य करताे, कधी शरीराचं.पण त्याला स्वत:ची समज मात्र मुळीच नाही. मग अशा व्य्नतीची तिच अवस्था हाेते, जी त्या रथाची असते, ज्याचा सारथी झाेपलेला आहे, ज्याचे सगळे लगाम तुटले आहेत, सगळे घाेडे स्वत:ला हवे तिकडे जाताहेत, कुणी डावीकडे, कुणी उजवीकडे, कुणी चालतच नसावा.. कुणी धावत असावा, कुणी बसलेला असावा.. घाेड्यांना ताब्यात ठेवण्याची वा एका दिशेने नेण्याची काही व्यवस्था नाही. अशा रथाचे काय हाेणार? अशा रथात बसलेल्या मालकाची जी अवस्था असेल, बराेबर तीच अवस्था आपली हाेऊन जाते.आपल्या लक्षात कधी हे आलं नसेल की, कधी आपली इंद्रिये परस्परांच्या विरुद्ध मागणी करीत असतात आणि आपण त्या दाेन्ही मागण्या मान्य करीत असता.
 
आपले शरीर एक गाेष्ट मागते तर मन बराेबर उलटी गाेष्ट मागते. आपण मात्र त्या दाेन्ही पुरवता. शरीर म्हणते, ‘आता थांब, आणखी भाेजन आत भरू नकाे. पाेटाला आता त्रास सुरू झाला.’ तर मन तिकडे म्हणते, ‘वा काय स्वादिष्ट भाेजन आहे. आणखी थाेडसं घ्यायला तर काहीच हरकत नाही.’ दाेघाचं आपण ऐकत असता. पण आपण हे पाहत नसता की काय करीत आहात. एक पाऊल डावीकडे टाकताय तर त्याच वेळी दुसरे उजवीकडे टाकताय.परस्परविराेधी कामे आपण एकाच वेळी करत असता, का तर विपरित इंद्रिये आणि विपरित वासना या दाेहाेंचा स्वीकार आपण एकदमच करता.
Powered By Sangraha 9.0