गीतेच्या गाभाऱ्यात

07 Dec 2022 13:20:01
 
पत्र एकाेणतीसावे
 

Bhagvatgita 
 
अष्ट नायिका असताना कृष्णाने आणखी कशाला साेळा हजार एकशे बायका केल्या? काही लाेक टिंगल करतात व म्हणतात.कृष्ण सवाई निजाम हाेता.खरा प्रकार काय आहे ताे समजून घे म्हणजे धु्नयाचे साम्राज्य जाऊन स्वच्छ प्रकाश पडेल, टीकाकारांचे पाश नाश पावतील व तुझ्या अंत:करणात कृष्णाबद्दल आदराचे आकाश निर्माण हाेईल.ताे भाग पुढील पत्रात तुझा राम पत्र तिसावे प्रिय जानकी, गेल्या पत्रात कृष्णाने अष्टनायिका असताना साेळा हजार एकशे बायका केल्या म्हणून टीकाकार जी टीका करतात तिचा उल्लेख केला हाेता व त्या बाबतीत खरा प्रकार काय आहे, ते पुढल्या पत्रात सांगताे असे म्हटले हाेते.खरा प्रकार असा-- आसामधील प्राग्ज्याेतिषपूरचा राजा नरकासुर हा अत्यंत दुष्ट हाेता. भारतातल्या सुंदर सुंदर कुमारिका पळवून नेऊन बंदीखान्यात टाकायचा. स्त्रियांच्या दृष्टीने हा भयानक प्रकार हाेता.
 
त्याने नरकासुरावर स्वारी केली व त्याला ठार मारले.प्राग्ज्याेतिषपूरच्या गादीवर कृष्णाने नरकासुराच्या मुलाला बसविले व बंदीखान्यात असलेल्या साेळा हजार एकशे कुमारिकांना साेडवून त्यांना घेऊन ताे द्वारकेस आला. त्या कुमारिकांच्या आईबापांकडे कृष्णाने त्या मुलींना घेऊन जाण्याबद्दल कळवले पण आईबापांनी निराेप पाठविला.‘‘ज्या दिवशी नरकासुराने आमच्या मुलींना पळवले त्याच दिवशी त्या पतित झाल्या, त्या आम्हाला मेल्याप्रमाणे आहेत; त्यांना आम्ही घरात घेणार नाही.’’ माेठा पेचप्रसंग निर्माण झाला. कृष्णाने महान कार्य केले, पण या कुमारिकांचे आता काय करावयाचे, हा बिकट प्रश्न त्याच्यापुढे उभा राहिला. त्याने पंडितांची सभा बाेलावली व त्या सभेत म्हटले- ‘‘या कुमारिका पतित कशा? त्यांचा काय दाेष आहे? या कुमारिकांना समाजाने पतित मानणे चूक नाही का? तुम्ही काय मार्ग सुचवता?’’ पंडित म्हणाले.
 
‘‘कृष्णा, तू म्हणताेस ते बराेबर आहे. या कुमारिकांचा दाेष नाही. पण समाज काेत्या विचारांचा आहे. समाजाला वाटते की.या स्त्रिया नरकासुराने पळवल्यामुळे पतित आहेत. त्यांच्याशी आता काेणी लग्न करणार नाही. त्यांचे आईबाप त्यांना घरात घेणार नाहीत. या स्त्रिया आता बेवारशी आहेत. वेश्या म्हणून जगून यांना आपला उदरनिर्वाह करावा लागेल.’’ कृष्ण म्हणाला.‘‘ठीक आहे, या साऱ्या स्त्रियांचे मी एकटा पालन पाेषण करताे. अन्न, वस्त्र व निवारा वगैरे साऱ्या गाेष्टींची तजवीज त्यांच्यासाठी मी करताे. मी त्यांना साेडवून आणले आहे.त्यांचे पालनपाेषण करणे आता माझे कर्तव्य आहे.’’ कृष्णाने त्या साेळा हजार एकशे स्त्रियांचे एकट्याने पालन पाेषण केले. त्या स्त्रिया अनाथ हाेत्या, त्या आता सनाथ झाल्या. संस्कृतमध्ये पती याचा एक अर्थ नवरा असा आहे, दुसरा अर्थ पालनकर्ता असा आहे.
Powered By Sangraha 9.0