ओशाे - गीता-दर्शन

06 Dec 2022 14:45:38
 
 

Osho 
 
जर काही नियती असेलच तर ती आपल्याद्वारे काम करीत आहे. आपण त्या नियतीला रस्ता द्यायला परम स्वतंत्र आहात. कारण आपणही परमात्म्याचे अंश आहात. आपल्या स्वातंत्र्यात रत्तीभरसुद्धा कमतरता नाहीये. आपण इतके स्वतंत्र आहात की नरकाला जाऊ शकता वा आपण इतके स्वतंत्र आहात की स्वर्ग निर्माण करू शकता. आपण इतके स्वतंत्र आहात की आपल्या एकेका पावलावर एकेक स्वर्ग वसेल आणि आपण इतके स्वतंत्र आहात की आपल्या एकेका पाऊलावर एकेक नरकही निर्माण हाेईल आणिसर्वकाही आपणावर अवलंबून आहे.आपणाशिवाय अन्य काेणीही जबाबदार नाहीये. तेव्हा आपण आपले मित्र आहात की शत्रू आहात याचा थाेडा विचार करा. मग हळूहळू एक गाेष्ट आपल्या ध्यानात येईल की आपलं शत्रू हाेणं आता अवघड हाेऊ लागलं आहे.
 
मित्र हाेणं साेपं हाेऊ लागलं आहे आणि मग हे सूत्र वाचा; तेव्हा या सूत्राचा राेख आणि आशय आपल्या समाेर प्रकट हाेईल.जाे आपल्या इंद्रियांना आणि शरीराला जिंकताे ताे आपला स्वत:चा मित्र हाेऊन जाताे आणि ज्याचा आपल्या शरीरावर इंद्रियांवर काहीही वश चालत नाही, ताे आपला स्वत:चाच शत्रू सिद्ध हाेताे.मैत्री आणि शत्रुत्व यांचे दुसरे पैलू समजून घ्यायला पाहिजेत. मैत्री-शत्रुत्वाचे सूत्र दुसऱ्या दिशेने, वेगळ्या परिमाणाने समजून सांगण्याचा या सूत्रात प्रयत्न आहे.ज्याचे शरीर आणि इंद्रियं ही परतंत्र आहेत, ज्याची इंद्रिये काही म्हणतात, ज्याचे शरीर काही म्हणते, मन काही म्हणते आणि ज्याचा स्वत:चा काेणताही विशेष आवाज नाही..
Powered By Sangraha 9.0