रामा मला एकच द्यावे । तुझे अनुसंधान टिकावे ।।

06 Dec 2022 14:46:37
 
 

Gondavlekar 
सकाळीं लवकर उठावें । भगवंताचें स्मरण करावें । हातपाय स्वच्छ धुवावे ।मानसपूजा करावी ।। हृदयांत ठेवावें रामाचें ठाण । षाेडशाेपचारें करावें पूजन । गंधूल करावें अर्पण । नैवेद्य करावा अर्पण । मनानें प्रसाद घ्यावा जाण ।। शेवटीं करावी प्रार्थना एक । रामा, तुला मी शरण देख ।। जें जें म्हटलें मी माझें । तेें तें रामा तुझें ।। आतां न गुंतवा माझें मन । रामा, मी आलाे तुला शरण ।। वासना न उठाे दुजी कांहीं । नामामध्यें प्रेम भरपूर देई ।। सदा राखावें समाधान । जें तुझे कृपेवाचून नाहीं जाण ।। नीतिधर्माचें आचरण । तुझे कृपेनें व्हावें जतन ।। आतां द्या नामाचें अखंड स्मरण । देह केला तुला अर्पण ।। रामा, जें जें कांहीं तूं करी । त्यांत समाधानाला द्यावें पुरी ।। आतां रामा, एकच करी । तुझा विसर न पडाे अंतरीं ।। तुझे नामाची आवडी । याहून दुजें मागणें नसावें उरीं । हेंचि द्यावें मला दान । दीन आलाें तुज शरण ।। रामा, मला एकच द्यावें । तुझें अनुसंधान टिकावें ।। नकाे नकाे ब्रह्मज्ञान । काव्यशास्त्रव्युत्पत्तीचें ज्ञान ।। काम- क्राेधाचे विकार । जाळिताती वारंवार ।। आता तारी अथवा मारी । तुझी कास कधीं न साेडी।। सदाचरण हें सुखाचें मुख्य साधन । त्यांत भगवंताचें करावें स्मरण । जेणें लाभेल खरें समाधान ।।
 
कर्तव्यांत राहावें आपण । फलाची अपेक्षा न ठेवतां जाण । कारण, प्रयत्न करणें आपले हातीं । यश देणें भगवंतापाशीं ।।?‘‘मी पडलाें तुझ्या दारीं । आतां रामा, तुझा झालाें । कत पणांतून मुक्त झालाें ।। माझें सर्व तें तुझें पाहीं ।। माझें मीपण हिराेन जाई ।। रामा, आतां एकचि करी । वृत्ति सदा राहाे तुझेवरी ।। रामा, मी काेठें जावें? । तुजवांचून काेठें राहावें? ।। देहबुद्धीची नड ार । ती करावी रामा तुम्हीं दूर ।। आजवर विषय केला आपलासा । न ओळखतां पडलाें त्याच्या ांसा ।। रामा, सर्व सत्ता तुझ्या हातीं । समाधान राहील अशी करावी वृत्ती ।। तुमचेजवळ मागणें दुजें नाहीं । हृदयांत तुझा वास अखंड राही ।। आतां तुझ्यासाठी माझें जीवन । तुला तन-मन केलें अर्पण ।। तुमचे चिंतनीं लागावें मन । कृपा करा रघुनंदन’’।। ऐसें करावें रामाचें स्तवन । रक्षणकर्ता एक भगवंत मनीं आणून ।। ऐसें व्हावें अनन्य दीन । तात्काळ भेटेल रघुनंदन ।। ऐसी रामास मारा हांक । ताे दूर नाहीं नाहीं खास ।। नामावर निष्ठा ठेवावी पूर्ण । मनीं असाे, नसाे, करावें नामस्मरण ।। नामाच्या संगतीं । ज्या व्यवहाराची प्राप्ती । ताेच व्यवहार जाई भगवत्सेवेप्रती ।। ज्ञान, विवेक, विरक्ती, । नामस्मरणें सर्वांची प्राप्ती ।। नामाविण दुजें कांहीं । सत्य सत्य त्रिवाचा नाहीं ।।
 
 
Powered By Sangraha 9.0