गीतेच्या गाभाऱ्यात

05 Dec 2022 14:12:49
 
 
पत्र एकाेणतीसावे
 

Bhagvatgita 
 
कृष्णाचे जीवन आदर्श जीवनाचा नमुना आहे. बालपण कसे घालवावे व सर्व सामान्य लाेकांनादेखील परमप्रिय शारीरिक श्नित कशी कमवावी याचे उदाहरण म्हणजे कृष्णाचे गाेकुळातील बालपण. मनुष्य वयाच्या सात वर्षेपर्यंत शिशु असताे, सात ते चाैदापर्यंत कुमार असताे व चाैदा ते एकवीस वर्षेपर्यंत त्याची पाैगंड दशा असते. नंतर एकवीस ते सत्तर वर्षेपर्यंत ताे तरुण असताे व सत्तर वर्षानंतर वृद्ध हाेताे.माणसाने एकशेवीस वर्षेेपर्यंत जगावे असे सांगण्यात आले आहे. माणसाने खूप पराक्रम करावा, विद्याध्ययन झाल्यावर मग लग्न करावे असे आपल्या शास्त्रकारांनी सांगितले आहे.वेदामध्ये व शास्त्रामध्ये आदर्श जीवनाबद्दल जे सांगण्यात आले आहे त्याचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे कृष्णाचे जीवन.कृष्णाने खूप पराक्रम केला, सांदिपनींकडे राहून गुरूंची आणि गुरूपत्नीची मनाेभावे सेवा करून विद्या संपादन केली व वयाच्या पंचविसाव्या वर्षी अठरा वर्षांच्या रु्निमणीबराेबर प्रेमविवाह केला. त्याने एकंदर आठ विवाह केले. त्याच्या अष्ट नायिकांची नावे अशी-
(1) रु्निमणी
(2) सत्यभामा
(3) सत्या
(4) भद्रा
(5) लक्ष्मणा
(6) जांबवती
(7) मित्रविंदा व
(8) कालिंदी
 
कृष्णाचा गृहस्थाश्रम आदर्श गृहस्थाश्रम हाेता. भागवतात एक माेठा मजेशीर प्रसंग आहे. एका सूर्यग्रहणाच्या वेळी प्रभास क्षेत्रावर खूप लाेक जमले हाेते. तेथे धार्मिक कृत्ये झाल्यावर एका ठिकाणी स्त्रियांचा सुखसंवाद सुरू झाला. द्राैपदीने कृष्णस्त्रियांना त्यांचा अनुभव विचारला. त्यावेळी श्रीकृष्णाच्या अष्टनायिका जे बाेलल्या ते ऐकण्यासारखे आहे.
(1) रु्निमणी म्हणाली- शिशुपालाशी माझा विवाह ठरला हाेता, पण माझ्या प्रेमपत्राला मान देऊन कृष्णाने माझे हरण केले व मला पत्नीपद देऊन जाे माझा गाैरव केला व कृष्ण माझ्यावर जे प्रेम करत आहे त्यामुळे मी धन्य धन्य झाले आहे.
(2) सत्यभामा म्हणाली माझ्या पित्याने कृष्णावर स्यमंतक मणि चाेरल्याचा खाेटा आराेप केला, पण नंतर कृष्ण निर्दाेष आहे असे समजून त्याने मला कृष्णाला दिले. माझे भाग्य थाेर म्हणून कृष्ण माझा पती झाला.
(3) जांबवती म्हणाली- माझा पिता जांबवान त्याने कृष्णाशी युद्ध केले पण नंतर कृष्णाची ओळख पटल्यामुळे त्याने मला स्यमंतक मण्यासह कृष्णाला अर्पण केले. कृष्णाची पत्नी झाल्यामुळे मला त्याची सेवा करायला मिळते आहे हे माझे परम भाग्य आहे.
(4) कालिंदी म्हणालीकृष्णाच्या पादस्पर्शाचा लाभ व्हावा म्हणून मी घाेर तपश्चर्या केली. शेवटी माझी तपश्चर्या फळाला येऊन कृष्णाने माझे पाणिग्रहण केले व मला धन्य केले.
(5) भद्रा म्हणाली- माझ्या स्वयंवरात कृष्णाने राजे लाेकांचा पराभव केला व मला पत्नी म्हणून स्वीकारले त्यावेळी मला कल्पनातीत आनंद झाला. त्याची पत्नी हाेण्याचे भाग्य मला जन्माेजन्मी लाभाे.
(6) सत्या म्हणाली- माझ्या पित्याने अत्यंत बलवान तापट व धारदार शिंगाचे सात बैल सिद्ध केले. जाे काेणी सात मस्त बैलांना धरून बांधून टाकू शकेल त्याला मला अर्पण करावयाचे असा पण लावला हाेता. ताे पण काेणीही जिंकू शकले नाही.
Powered By Sangraha 9.0