तुका म्हणे काळें तरी । मज सांभाळील हरी ।।2।।

31 Dec 2022 15:25:35
 
 

saint 
 
आपला आपल्यावर विश्वास असलाच पाहिजे. कारण ज्याचा स्वत:च्या कर्तृत्वावर विश्वास आहे, त्याच्या सर्द्तनाचा, सद्विचाराचासांभाळ त्याच्याकडून आपाेआप हाेत असताे.जर एखाद्याकडे आत्मविश्वासच नसेल म्हणजेच मनाची कमजाेरी व धरसाेड वृत्ती असेल तर इतरांचे आशीर्वाद हवे तेवढे फलदायीठरत नाहीत.आपल्या वर्तनावर आपला दृढ विश्वास असेल तर आपण आपल्या सद्गुरू कृपेस पात्र हाेताेच. काेणाचे वाईट करायचे नाही, असा संकल्प करून जगणाऱ्याकडून खराेखरच काेणाचे वाईट हाेत नाही. खऱ्या अर्थाने असा संकल्प ईर्षा, द्वेष, मत्सर, काम, क्राेध, अहंकार आदिची नष्टता झाल्याशिवाय हाेत नाही.
 
याचाच अथ असा हाेताे की, असा संकल्प करून वागणारा आपाेआप समता, बंधुता, निस्वार्थ प्रेम, कर्तव्याच्या मार्गावर चालताे. समचरणी उभा राहून मानवतेचा संदेश देणाऱ्या सर्व जीवरूपी पांडुरंगाची कृपा अशा मार्गस्थावर असणारच आहे. ही कृपा आपणावरही राहावी, अशी ज्ञानाेबा-तुकाेबा चरणी प्रार्थना. महाराजांच्या अभंगाचे हे अर्थ आम्ही आमच्या अल्प बुध्दीला सुचेल तसे काढले असल्याने मूळ अर्थासाठी गाथा वाचाणे आवश्यक आहे.यातील उणिवा आपण पदरात घ्याव्यात. महाराजांची गाथा हा अनुभूतीचा विषय आहे. जय जय राम कृष्ण् हरी.
- डाॅ. विजयकुमार पं. फड श्री माऊली निवास, श्री माऊली नगर, जालना माे. 9422216448
Powered By Sangraha 9.0