सुखाची जणू एक लहरच! हे तादात्म्य, सुख-दु:खाशी बांधले जाण्याची ही वृत्ती, हेच उत्तेजनेचे कारण आहे. आणि ही वृत्ती आपण ताेडू शकताे.सुख-दु:खे येत राहतील, ती कधी, बंद हाेत नसतात. बुद्धांच्या पायातही काटे टाेचतात, बुद्धही आजारी पडतात, बुद्धांनाही मृत्यू येताे. पण ताे आपल्यापेक्षा वेगळ्या प्रकारे येताे. मृत्यू तर आपली पद्धत बदलणार नाही, मृत्यू तर आपल्या पद्धतीनेच येईल. पण बुद्ध स्वत:लाच इतकं बदलून घेतात की त्यांना मृत्यू येण्याची पद्धत संपूर्ण बदलून जाते.बुद्ध मृत्यूच्या जवळ आहेत, जीवनदीप विझण्याच्या बेतात आहे, शरीर सुटायची वेळ आता येऊन ठेपलेली आहे आणि एक भिक्षू बुद्धांना विचारीत आहे की, ‘फार ्नलेश हाेत आहेत, मन फार दु:खी हाेत आहे, आपण थाेड्याच वेळात असणार नाही.’ बुद्ध म्हणतात की, ‘मृत्यू येत आहे म्हणजे जाे हाेता ताे राहीलच, जाे नव्हता ताेच जाईल.
म्हणून तू व्यर्थ दु:खी हाेऊ नकाेस. जाे नव्हता ताे आहे असे आपणास फ्नत वाटत हाेते. नसलेल्यालाच मृत्यू नाहीसे करू शकताे. ताे फ्नत एक स्वप्न हाेता, आपली ती फ्नत धारणा हाेती, त्याचे अस्तित्व नव्हते. ताे फ्नत एक विचार हाेता. प्रत्यक्षात ज्याची काही श्नयताही नव्हती, ताेच संपून जाईल. जाे नव्हता ताेच संपेल, ज्याला अस्तित्वच नव्हते आणि जाे हाेता त्याच्या संपण्याचा काही प्रश्नच नाही, जाे आहे, ताे कायम राहीलच! मृत्यू तर येत आहे पण बुद्ध मृत्यूकडे वेगळ्या तऱ्हेने पाहतात. मी मरणार अशा तऱ्हेने ते पाहत नाहीत. ते हे पाहतात की जे तत्त्व मरू शकते ते मेलेलं आहेच, तेच मरेल. ते स्वत:ला दूर असे करू शकतात, तटस्थ हाेऊ शकतात.मृत्यूची नदी वाहून जाईल. बुद्ध तीरावर उभे राहतील-त्या प्रवाहापासून अलग, बाहेर, व्यथाही येते, दु:खही येते, सर्व येत राहील.