गाेंदवल्याच्या रामासारखे जाज्वल्य स्थान दुर्मिळ

03 Dec 2022 15:04:14
 
 

Gondavelakr 
 
‘मला सर्व कळते’ असे माझ्याबद्दल तुम्ही म्हणता, पण ते मनापासून नव्हेच; कारण ज्याला असे खराेखर वाटत असेल त्याच्या हातून पापकर्म हाेणारच नाही. ज्याची वृत्ती माझ्याशी एकरूप हाेईल त्यालाच असे कळेल की मला सर्व कळते आहे. माझे बाेलणे प्रत्येकाला कळते; ज्याची जेवढी तयारी असेल तेवढे त्याला कळते, पण वाया कुठेच जात नाही. ज्याला परमार्थबुद्धी नसेल त्याच्यात माझ्या बाेलण्याने ती जागृत हाेईल, जाे साधनात आहे त्याला पुढचा मार्ग प्रकाश पावेल आणि ज्याला साधले आहे त्याचे ते स्थिर हाेईल. माझ्याकडे जाे येईल त्याला मी ‘राम’ म्हणायला लावीनच; निदान ‘मी राम म्हणणार नाही’ असे वदवून तरी ‘राम’ म्हणायला लावीन. एखाद्या वर्गातली पुष्कळ मुले पास झाली तर ताे वर्ग शिकवणाऱ्या शिक्षकाला बढती मिळते त्याप्रमाणे, माझ्याशी ज्यांचा संबंध येईल ते चांगले वागले तर त्यामध्ये मला ायदाच आहे.
 
नामावर प्रेम करणे म्हणजेच माझ्यावर प्रेम करणे. ज्याला मी भेटावा असे वाटते, जाे माझा म्हणविताे, त्याला नामाचे प्रेम असलेच पाहिजे. माझी अशी खात्री आहे, नव्हे, माझी अशी प्रतिज्ञा आहे की, जाे मी सांगितल्याप्रमाणे वागेल त्याचे काम मी रामाचा हात धरून त्याच्याकडून करवून घेईन; कारण रामानेच हे काम करायला मला सांगितलें आहे.गाेंदवल्याच्या रामासारखे जाज्वल्य स्थान सापडणे कठीण आहे. आजपासून नामाशिवाय रहायचे नाही असा निश्चय करा. तुम्ही कुणाच्याही नादी लागू नका?- त्यात मीसुद्धा आलाे - पण भगवंताच्या नादी मात्र लागा.काेणत्याही परिस्थितीत अखंड अनुसंधान तुम्ही टिकवावे ही माझी इच्छा आहे. तुमचा भाेग मी कमी करीत नाही; ताे तुमच्या कर्मांचा परिणाम असल्यामुळे ताे कमी करणे हे पाप आहे.
 
पण मनुष्य कशाही प्रसंगात असाे, त्याचे दु:ख त्याला विचारून मी त्याला खात्रीने समाधान देईनच देईन.प्रपंची माणसाच्या दु:खाची मला पूर्ण जाणीव आहे. ती जाणीव ठेवूनच, भगवंताचे नाम घ्या असे मी म्हणताे.जगातले दु:ख मला पाहवत नाही. दु:ख नसावे असे मला वाटते. तुमचे दु:ख पाहून मला दु:ख वाटते; पण तुमचे दु:ख जसे खरे नसते, वरवरचे असते, कारण ज्याला खरे दु:ख झाले ताे जगणारच नाही - तसे माझे दु:खही वरवरचे असते. मी सुखाचा खूप शाेध केला आणि ते मला सापडले; मी तुम्हाला त्याचा निश्चित मार्ग सांगेन; ताे मार्ग म्हणजे भगवंताचे अनुसंधान.तुम्ही सर्वानी नामात रहावे, राम तुमच्यावर कृपा करील हा तुम्हा सर्वांना माझा आशीर्वाद आहे.
Powered By Sangraha 9.0