ऐका नवविधा भजन। सत्शास्त्री बाेलिलें पावन। हाेईजे येणे ।।1।।

29 Dec 2022 13:50:47
 

Saint 
 
श्री दासबाेधाचा मुख्य हेतूच मुळी ‘‘येथ बाेलिला विशद। भ्नतीमार्ग।। असा भ्नितमार्ग समजावून देण्याचा आहे. त्या मुख्य निरूपणासाठी श्राेत्यांच्या मनाची व चित्ताची पूर्वतयारी पहिल्या तीन दशकांत दृश्य वस्तूंची आणि मानवी देहाची अनिश्चितता सांगून केल्यानंतर आता चाैथ्या दशकापासून श्रीसमर्थ भ्नितमार्गाच्या निरूपणाला प्रारंभ करीत आहेत. यातील नऊ समासात त्यांनी भ्नतीचे नऊ प्रकार स्पष्ट करून सांगितले असून, शेवटच्या दहाव्या समासात मु्नतीच्या चार प्रकारांचे विवेचन केलेले आहे.परमेश्वराची भ्नती नऊ वेगवेगळ्या मार्गांनी करता येते. परमार्थात तिला नवविधा भ्नती म्हटले जाते. श्रवण, कीर्तन, नामस्मरण, पादसेवा, अर्चन, वंदन, दास्य, सख्य आणि आत्मनिवेदन अशा या नऊ मार्गांनी भगवंताची भ्नती करून त्याला प्रसन्न करून घेता येते.
 
यातील प्रत्येक मार्ग स्वयंपूर्ण आहे म्हणजे यापैकी काेणत्याही एका मार्गात पूर्ण निष्ठा व श्रद्धा ठेवून ताे अनुसरला तरी भ्नत पावन हाेताेच, परंतु तरीही दुसऱ्या दृष्टीने या मार्गांची रचना चढत्या भाजणीप्रमाणे असून आत्मनिवेदन हा सर्वांत शेवटचा मार्ग तसा श्रेष्ठ मानला जाताे.चाैथ्या दशकाच्या पहिल्या समासाचे नावच मुळी श्रवणभ्नती हे आहे व यातील निरूपण श्रवणमार्गाने कशी आत्माेन्नती करून घ्यावी याचे आहे. माणसाच्या ऐकण्याची क्रिया कानांद्वारे हाेते. आपण जे ऐकताे त्यालाच श्रवण करणे म्हणतात आणि विविध ज्ञान, भगवंताच्या अनेक लीला यांचे सतत श्रवण करून त्याच्या ठायी भ्नितभाव दृढ करणे म्हणजेच श्रवणभ्नती हाेय
Powered By Sangraha 9.0