गीतेच्या गाभाऱ्यात

29 Dec 2022 13:47:15
 
 
पत्र तेहतिसावे
 

Bhagvatgita 
 
लाेक म्हणाले, ‘‘हा विचार अगदी नवीन आहे. आम्ही समर्थांच्याबद्दल खूप खूप वाचले आहे व ऐकले आहे पण हा विचार कधी ऐकला नाही वा वाचला नाही. इतका सुंदर सुरेख विचार तुम्हाला कसा सुचला?’’ मी म्हटले- ‘‘समर्थांची कृपा’’ ताे विचार असा-- राजकारणात क्रांती सुरू झाली म्हणजे कायदेभंग हाेताे, काव्यात क्रांती सुरू झाली म्हणजे वृत्तभंग हाेताे. मनाच्या श्लाेकाच्या वेळीएकदम एक क्रांतिकारक विचार स्फुरला समर्थाच्या ताेंडून उद्गार निघाले.देहदु:ख ते सुख मानीत जावे.हा क्रांतिकारक विचार स्फुरल्यावर समर्थांना पराकाष्ठेचा आनंद झाला. या विचारात फार फार सामर्थ्य आहे. या विचारामुळे नैराश्येचा अंध:कार निघून जाताे. सुखाचा प्रकाश दिसू लागताे.मनाचे श्लाेक ज्या वृत्तांत आहेत त्या वृत्ताप्रमाणे प्रत्येक ओळीचे पहिले अक्षर ऱ्हस्व असते व दुसरे अक्षर दीर्घ असते.
 
‘गणाधीश जाे- या ओळीत किंवा मना सज्जना भ्नितपंथेचि जावे-या ओळीत किंवा सदा सर्वदा याेग तुझा घडावा-‘या ओळीत पहिले अक्षर ऱ्हस्व आहे व दुसरे अक्षर दीर्घ आहे; पण देहदु:ख ते सुख मानीत जावे-या ओळीत पहिले अक्षर दीर्घ आहे व दुसरे अक्षर ऱ्हस्व आहे.येथे वृत्तभंग आहे. ताे क्रांतिकारक विचार समर्थांना इतकाइतका आवडला की त्यांनी वृत्तभंगाची पर्वा न करता ताे विचार मनाच्या श्लाेकात तसाच ठेवून दिला.आपणही वृत्तभंगाची पर्वा करू नका. त्या क्रांतिकारक विचाराचे सामर्थ्य पहा व सुखी हाेण्याचा प्रयत्न करा.
 
*** समर्थांची आई व एकनाथ महाराज यांची बायकाे या बहिणी बहिणी.
 
*** तू असे लक्षात घे की एकनाथ व रामदास हे नुसतेच नातेवाईक नव्हते तर ते वाङमयीन नातेवाईक देखील हाेते. रामकथा सांगताना देवद्राेही रावणास मारून रामराज्याची गुढी उभारणे व धर्माचे अध:पतन दूर करून धर्माचे उत्पादन करणे यावर एकनाथांनी जाेर दिला व रामदासांनी देखील तेच कार्य केले. प्रपंच व परमार्थ याच्या समन्वयाचे राेपटे एकनाथांनी लावले. रामदासांनी त्या राेपट्यास खतपाणी घालून त्याचा प्रचंड वृक्ष केला.
 
*** नारायण अकरा वर्षांचा झाला. आई त्याला म्हणालीनारायणा, गंगाधर कुलकर्णीपणाचे काम पाहाताे. ताे प्रपंचाची चिंता वाहताे. तू काहीच चिंता करत नाहीस? नारायण काेणाला न सांगताच अडगळीच्या खाेलीत गेला व आसन घालून चिंतन करत बसला.तिन्हीसांज झाली तरी नारायणाचा पत्ता नाही. आईने इकडे तिकडे हुडकले व ती अडगळीच्या खाेलीत गेली. तेथे नारायणाला पाहून आईने विचारले- ‘‘काय करताे आहेस?’’ नारायण म्हणाला- ‘‘आई चिंता करताे विश्वाची।’’ अकरा वर्षांचा मुलगा अडगळीच्या खाेलीत जाऊन बसताे, बाहेर येत नाही व विचारले तर म्हणता
Powered By Sangraha 9.0