गाेष्टी वाचा, काहीतरी करा. काही असं करायला मिळालं नाहीच तर रस्त्यात ध्नके मारा, शिव्या द्या.काही ना काही तरी कराच.आता आपण अशा भ्रांतीत पडायचं काहीच कारण नाही की, आपण हे करीत आहात. कारण याच्याआधी, चाैदा वर्षाआधीपण आपण हाेताच; पण तेव्हा ही ग्रंथी सक्रिय नव्हती. ते इंद्रिय झाेपले हाेते. आता ते इंद्रिय जागे झाले आहे. आपण हे जे काही करत आहात ते ते इंद्रियच आपणाकडून करवून घेत आहे. ही इंद्रियेच माझ्याकडून करवताहेत. मी वेगळा आहे. जर इतका बाेध झाला की, इंद्रिये माझ्याकडून करवून घेताहेत, मी वेगळा आहे - ज्या दिवशी आपणास वेगळेपणाचा अनुभव येईल तेव्हाच आपण आपल्या मालकीची घाेषणा करू शकाल. गंमतीची गाेष्ट अशी आहे की, आपण घाेषणा करू लागताच सगळी इंद्रिये पाया पडू लागतात. बस्स, आपणात फ्नत घाेषणा करण्याची हिंमत मात्र पाहिजे.
त्या महाल-मालकाची गाेष्ट मी आपणास सांगितली आहे. की ताे एक तर घराच्या बाहेर आहे, वा झाेपलाय, वा बेशुद्ध आहे, वा गैरहजर आहे.. सगळे नाेकर मालक हाेऊन बसलेत. ती गाेष्ट आपण आणखी जरा पुढे वाढवू शकताे की, ताे मालक परत आला आहे. त्या मालकाचा रथ दारावर आला आहे. आता जाे नाेकर दारावर आहे ताे ‘मी मालक आहे’ असे ओरडत नाहीये. काय बिशाद आहे त्याची असं म्हणण्याची. ताे लगबगीने मालकाला सामाेरा जाताे आणि त्याचे पाय धरून म्हणताे, ‘फार वेळ लागला. आम्ही सगळे केव्हाची वाट पाहत आहाेत.