जयांचा ईश्वरी जिव्हाळा। ते भाेगिती स्वानंद साेहळा ।।2।।

26 Dec 2022 16:32:36
 
 

saint 
 
तीच स्थिती आपणासारख्या सामान्य माणसांची असते. तारुण्य, वैभव, प्रपंच हे सर्व साेडून शेवटी एकट्यालाच मृत्युपंथाने जावे लागते. येथे श्रीसमर्थ फार छान उपमा देतात. ते म्हणतात, जसे एका झाडावर बसलेले पक्षी दिवस उजाडताच स्वतंत्रपणे दाही दिशांना पांगतात, तसे काेणती वेळ कशी येईल हे सांगता येत नाही आणि असा काही प्रसंग आला की सुखाची सर्व साधने संपुष्टात येतात आणि आप्तस्वकीयही साथ साेडून निघून जातात आणि शेवटी ‘एकटा ताे एकटा’ अशीच परिस्थिती हाेते.तेव्हा या सर्व भ्रममूलक आणि नाशवंत ऐहिक सुखाचा लाेभ साेडून वैराग्यमार्ग धरला पाहिजे. असे जे भाविक करतील त्यांचे अनेक पूर्वजन्मांचे पुण्य सफल झाले म्हणावे लागेल आणि ते निश्चितपणे भगवंतप्राप्ती करून घेतील.
 
अशांना मग प्रापंचिक गाेष्टींबद्दल तटस्थता येते, ते संसारदु:ख विसरतात. विषयसुखाचा रंग साेडून देतात आणि श्रीरंगाच्या रंगामध्ये पूर्णपणे रंगून जातात. अशांचा प्रपंच आणि परमार्थ दाेन्हीही ताे दयाळू भगवंत सांभाळताे. त्यामुळे ते जिवंतपणीच ईश्वरप्राप्तीचा आनंदसाेहळा भाेगतात आणि मृत्यूनंतरही जन्ममरणाच्या चक्रातून मु्नत हाेऊन परमगतीला प्राप्त हाेतात. म्हणूनच श्रीसमर्थ म्हणतात की, सामान्य माणूस कल्पनाही करू शकणार नाही अशा अलाैकिक आणि अक्षय आनंदाचा ठेवा त्यांना प्राप्त हाेताे.असे जे करीत नाहीत ते मनुष्यजन्म मिळूनही ताे करंटेपणाने वाया घालवितात. तेव्हा आपण या सगळ्याचा बाेध घेऊन अनित्य प्रपंचाचे खरे स्वरूप ओळखून भ्नितमार्गाची कास धरून मनुष्यजन्म सार्थकी लावणे जरूर आहे! - प्रा. अरुण गाेडबाेले, माे. 9822016299
Powered By Sangraha 9.0