आपण जर असा विचार करत असाल, ‘मी रागावताे’, तर ती आपली चूक आहे. आपल्या इंद्रियांमध्ये क्राेधाच्या ग्रंथी आहेत आणि त्यामध्ये विष एकत्र झाले आहे. ते आपण जन्माेजन्मींच्या संस्कारांमध्ये गाेळा केलेले आहे. ती विष ग्रंथी आपल्याकडून क्राेध करवते.
पावलाेवने शेकडाे प्रयाेग केले आहेत आणि म्हटले आहे, जर ही विषाची गाठ कापून फेकून दिली, अन् मग त्या माणसाला कितीही शिव्या दिल्या तरी मग ताे माणूस क्राेध करू शकणार नाही. कारण क्राेध करणारे उपकरणच जागेवर राहिलेले नाही. हे असेच आहे - जसा माझा हात कुणी कापावा आणि म्हणावे की, ‘हस्तांदाेलन करा. हात पुढे आणा.’ असं कितीही म्हटलं तरी मी तसे अजिबात करू शकणार नाही. कारण हातच जागेवर नाही. मागे फ्नत नपुंसक इच्छा राहील. हात तर मिळणार नाही, उपकरण तर मिळणार नाही.
इंद्रियांपाशी आपापले संग्रह असतात - हार्माेन्सचे. आणि प्रत्येक इंद्रिय आपणाकडून काही ना काही काम करवून घेत असते आणि त्याच्या ध्न्नयामुळे आपण काम करत राहता.जेव्हा कामेंद्रियात जाऊन वीर्य हाेते, केमिकल्स्, रसायने गाेळा हाेतात, तेव्हा ती आपणाला ध्नका देऊ लागतात की, ‘चला आता कामातुर व्हा.’ वयाच्या चाैदा वर्षांपूर्वी कामवासना जागल्याची जाणीव हाेत नाही. चाैदा वर्षे झाली की ग्लॅड परिप्नव हाेते. सक्रिय हाेते. ही ग्रंथी सक्रिय झाली की, ती आपणास ध्नके देणे सुरू करते की, चला आता कामवासनेत उतरा. नग्न चित्रे पाहा, फिल्मस् पाहा.