ऑस्ट्रेलियाच्या समुद्र हद्दीत जलचर शास्त्रज्ञांना काेकाेस बेटाजवळ एक भीतिदायक चेहऱ्याचा मासा आढळला आहे. सिडनी येथील ऑस्ट्राेलियन संग्रहालयाचे मासेतज्ज्ञ यी-काई टी यांनी हा मासा स्लाेएन्स व्हायपर फिश असल्याचे सांगितले. हा मासा हिंद महासागरात सुमारे 500 ते 1000 मीटर खाेल पाण्यात आढळला.या व्हायपर फिशचे दात अणकुचीदार आणि माेठे आहेत. हे दात माशाच्या ताेंडातून बाहेर आलेले आहेत.