दु:ख माेठा धीट पाहुणा आहे. याने जर का तुमच्या घराची वाट धरली, तर ताे तुमच्या घरापर्यंत पाेहाेचणारच.हा पाहुणा जर तुमच्या घराकडे येताेय असे पाहून तुम्ही समाेरचा दरवाजा बंद केलात, तर ताे मागच्या दरवाजाने घरात घुसेल. खिडकी बंद करून ठेवलीत, तर छप्पर ाडून घुसेल नाही तर फरशा उखडून घुसेल, धीट पाहुणा आहे ना! शेवटी काय, तर आयुष्यात वागताना सुखाबराेबर दु:खाचेही स्वागत करा आणि आदरातिथ्य करा.