या माेसमात बाहेरच्या खाद्य-पेय पदार्थांमध्ये अन्नाची गुणवत्ता आणि त्यांचे ताजे असणे सुनिश्चित करता येऊ शकत नाही. घरातही शिळे पदार्थ ेकून देण्याऐवजी खाऊन संपवण्याची प्रवृती असते, पण यामुळे हाेणारे नुकसान कित्येक पटीने जास्त असू शकते. यासाठी माेसमास अनुरूप खाण्या-पिण्यात बदल करायला तर हवाच साेबतच त्यांच्या सुरक्षिततेच्या व सेवनाच्या पद्धतीही समजून घ्यायला हव्यात.
का हाेतेफूड पाॅइझनिंग :फूड पाॅइझनिंग हाेण्याची अनेक कारणे आहेत. सामान्यत: शिळे, खराब वा सडलेले पदार्थ खाल्ल्यामुळे ही समस्या हाेऊ शकते. राेगप्रतिकारक्षमता जर कमकुवत असेल तर त्याचे दुष्परिणाम अधिकच गंभीर असतात.पाेटदुखी, डायरिया, जुलाब इ. समस्या हाेतात.मुले आणि वृद्घांना याचा सर्वांत जास्त त्रास हाेताे.मटण आणि भाज्या इ.द्वारे बॅक्टेरिया पसरू शकताे.अर्धवट शिजलेल्या आणि खराब अन्नामुळेही धाेका असताे ज्यामध्ये मूळ रूपात काेलाेस्ट्रीडियम, साल्माेनेला आणि ई-काेलाईचे संक्रमण दिसून येते. हे गंभीर स्थितीत प्राणही संकटात टाकू शकते. जर एखाद्याला बद्धकाेष्ठता, गॅस इ.सारखी पाेटासंबंधित एखादी समस्या पूर्वीपासूनच असेल, तर त्याच्यावरफूड पाॅइझनिंगचा जास्त परिणाम हाेण्याची शक्यता असते.
लक्षणे लक्षात घ्या...
कित्येकदाफूड पाॅइझनिंगचे सुरुवातीचे लक्षण पाेटदुखी असते.
काहीही खाल्ल्यानंतर त्वरित उलटी वा जुलाब हाेणे.
तापही असू शकताे. अशक्तपणा जाणवताे.
वारंवार उलटी व जुलाब हाेणेहीफूड पाॅइझनिंगचे लक्षण आहे.
बऱ्याचदा डाेकेदुखीही हाेते.
जर एखाद्याला जेवणानंतर अचानक अशक्तपणा जाणवू लागला तर त्याकडे दुर्लक्ष करू नये.
दक्षता सुनिश्चित करा : जेव्हा अन्न चांगल्या प्रकारे शिजवले जात नाही तेव्हा ते लवकर खराबही हाेते. डाळ असाे वा भाजी व्यवस्थित शिजवा. गरज लक्षात ठेवूनच जेवण बनवा. तरीही अन्न उरले तर ते गरम करा आणि 90 मिनिटांनंतरच ि्रजमध्ये 4 डिग्री सेल्सियसवर ठेवा. ि्रजमध्ये ठेवल्यानंतर पदार्थ 24 तासांच्या आतच खायला हवेत. हीच गाेष्ट सर्व कच्च्या व शिजलेल्या भाज्या आणि रसाळ फळांवरही लागू हाेते. तीही 4 डिग्री तापमानावर स्टाेअर करावीत. चपात्या-भाकरी ठेवू नयेत.