आपण श्राेत्यांशी सलगी का करीत आहाेत याचा खुलासा ज्ञानेश्वर वारंवार वेगवेगळे दृष्टांत देऊन करीत आहेत. आपण निरूपण करताे ही श्राेत्यांचीच माेठी कृपा आहे असे ज्ञानेश्वर सांगतात. त्यांच्यामुळे आपण बाेलते झालाे हेही ते मान्य करतात. आपण अवधान द्यावे अशी धिटाईने विनंती ज्ञानेश्वर श्राेत्यांना का करतात? तर त्यांच्या बाेलण्याने श्राेत्यांचे कृपाळू चित्त जागृत झालेले त्यांनी पाहिले. म्हणून त्यांनी अवधानाची अपेक्षा केली. नाहीतर आढीत घालून चांदणे पिकवता येते का? आकाशाला गवसणी काेण घालणार? पाणी पातळ करावे लागत नाही. लाेण्यात रवी शिरू शकत नाही.ब्रह्मवस्तूला पाहताच तिचे वर्णन करणारे शब्द लाजून परत िफरतात. प्रत्यक्ष वेददेखील माैन धारण करतात. अशा अवस्थेत गीतेतील अर्थरूप ब्रह्मवस्तू मराठी भाषेत मला कशी आणता येईल?
तरीसुद्धा गीतार्थ सांगण्यास अयाेग्य असूनही मी प्रयत्न करीत आहे, ते तुमच्यासारख्या सज्जनांच्या कृपेमुळेच. म्हणून श्राेतेहाे, एकाग्र चित्ताने माझ्या गीतार्थाचे श्रवण करून मला उत्तेजित करा. तुमच्या कृपादृष्टीचा वर्षाव माझ्यावर झाला की, माझ्या बुद्धीत भावार्थ सांगण्याचे सामर्थ्य निर्माण हाेते.नाही तर तुम्ही जर उदासीन राहिलात तर ज्ञानाचा ुटलेला अंकुरही सुकून जाताे. म्हणून स्वाभाविकच आहे की, वक्त्याच्या बाेलण्याला श्राेत्यांनी एकाग्रतेने व प्रेमाने साथ द्यावी. कारण त्याच्या मुखातून निघालेली अक्षरे सिद्धांतांनी भरलेली असतात. येथे अर्थ आधी तयार हाेऊन शब्दांची वाट पहात असताे.सिद्धांतातून सिद्धांत प्रकट हाेताे. बुद्धीवर सद्भावनाचा ुलाेरा उमटताे.