पत्र बत्तिसावे
One thing at a time हे सृष्टीतील सूत्र मनाला लागू आहे.चिंता सुरू झाली की चिंतेच्या विचारामुळे मन कासावीस हाेते.अन्न गाेड लागत नाही. झाेप येत नाही. अशा वेळी चिंतेवर रामबाण उपाय म्हणजेआपले मन चांगल्या कामात गुंतवणे.मन कामात गुंतले म्हणजे चिंतेला मनामध्ये शिरण्यास मज्जाव हाेताे. जिवाभावाचा मित्र आर्थर हॅलम वारल्यावर टेनिसनला वाटले आपण आता वेडे हाेऊ.पण त्याने आपले मन एका माेठ्या कामात इतके गुंतवले की त्याला चिंता करण्यास फुरसतच मिळाली नाहीगीता वाचून तुला कळेल कीकर्तव्यकर्माची हाक ऐकू येत असताना आपण फळाची अपेक्षा न करता ते कर्तव्यकर्म करण्यात रंगून जावे म्हणजे आपले मन प्रसन्न हाेते व प्रसन्न मनापुढे उष्णतेपुढे बर्फ वितळावे त्याप्रमाणे चिंता वितळून जाते.लाँगफैलीची तरुण सुंदर बायकाे एकाएकी कपडे पेटल्यामुळे ओरडू लागली. लाँगफेलाे तिच्या मदतीस गेला पण त्याच्या डाेळ्यादेखत ती भाजून मेली.
ताे देखावा इतका हृदयद्रावक हाेता की लाँगफैली जवळजवळ वेडा झाला. इत्नयात त्याची मुलेआई आई म्हणून ओरडू लागली.लाँगफैलीला समजले कीआता आपणच या मुलांची आई.त्या मुलांच्या बाबतीत आईचे कर्तव्य करण्यात ताे इतका गढून गेला की, चिंता करण्यास त्यास फुरसतच मिळेना.तू असे लक्षात घे कीचिंतेमुळे मन कासावीस हाेण्याचे रहस्य जर काेणते असेल तर ते हेच की चिंता करण्यास फुरसत मिळणे.चिंतेवरील स्वस्तातले स्वस्त औषध म्हणजे मन चांगल्या कामात गुंतवून ठेवणे.2 एखाद्या गाेष्टीची चिंता सुरू झाली म्हणजे शांतचित्ताने विचार करावा व जास्तीत जास्त वाईट काय हाेईल त्याचा मनाने आढावा घ्यावा. हा आढावा घेतला म्हणजे ती जास्तीत जास्त वाईट गाेष्ट स्वीकारण्याची मनाने तयारी करावी व ती हाेऊ न देण्याबद्दल जास्तीत जास्त खटपट सुरू करावी.
Prepare for the worst and try for the best (वाईटातली वाईट गाेष्ट स्वीकारण्याची मनाने तयारी ठेवा.चांगल्यातल्या चांगल्यासाठी खटपट करा) हा महामंत्र दुसऱ्या अंगाचा विचार करताना उपयाेगी आहे.गीता सांगताना कृष्णाने अर्जुनास सांगितले कीजास्तीत जास्त वाईट काय हाेईल तर तुझा पराजय हाेईल किंवा तू मरशील.तू असे लक्षात घे कीजास्तीत जास्त काय वाईट हाेईल ते स्वीकारण्याची मनाने तयारी केली व चांगल्यातल्या चांगल्यासाठी खटपट सुरू केली की मन हलके हाेते व चिंता निघून जाते.Importance of Living या पुस्तकात लिन युटांग या चिनी तत्त्वज्ञाने म्हटले आहे True peace of mind comes from accepting the worst मनाचे खरेखुरे स्वास्थ्य वाईटातली वाईट गाेष्ट स्वीकारण्याने प्राप्त हाेते.