अहाे ता्नह्याचें लागतां झटें। तेणें अधिकचि पान्हा ुटे। राेषे प्रेम दुणवटे। पढियंतयाचेनि।। 9.18

21 Dec 2022 12:56:38
 
 

Dyaneshwari 
 
 
ज्ञानेश्वरीत ‘एक तरी ओवी अनुभवावी’ अशी जातीची ओवी शाेधीत असताना वरील ओवीपाशी येऊन आपण थांबताे. तशा सर्वच ओव्या अनुभवण्यासारख्या असल्या तरी दीर्घकाळ मनात रेंगाळतील अशा ओव्यांपैकी वरील ओवी आहे. आपण हट्टाने मायबाप श्राेत्यांपुढे प्रतिज्ञा का करीत आहाेत, याचे स्पष्टीकरण ज्ञानेश्वर विविध अंगांनी करीत आहेत. हट्ट करणारा, त्रास देणारा, उनाड असणारा, पदराखाली ढुशा देणारा मुलगा आईला अत्यंत प्रिय असताे. हे ते विविध मार्गांनी सांगत आहेत.लहान मूल बाेबडे बाेल बाेलते किंवा वाकडेतिकडे पाऊल टाकत चालू लागते. तेव्हा त्याचे काैतुक त्याची आई करीत नाही काय? संतश्राेत्यांनी आपल्यावर प्रेम करून आपले लळे पुरवावेत म्हणून मी ही सलगी करीत आहे. माझ्यावर प्रेम असल्यामुळेच तुम्ही माझा गीतार्थ श्रवण करीत आहात. नाहीतर मी काेणता गर्व करणार? तुम्ही आहात म्हणून मी आहे.
 
नाहीतर सुवासाने वास कशाचा घ्यावयाचा? समुद्राने अंघाेळ काेठे जाऊन करावी? म्हणून संतश्राेते, तुमच्यापुढे मी लडिवाळपणाने बाेलू नाही का? प्रेमाने काडवातीने आपण सूर्यास ओवाळत नाही का? समुद्राच्या पाण्याने आपण त्यासच अर्घ्य देत नाही काय? असे सांगून ज्ञानेश्वर म्हणतात की, श्राेतेहाे, तुम्ही शंकराच्या मूर्ती आहात.मी माेठ्या प्रेमाने निर्गुडीच्या पानाने तुमचे अर्चन करीत आहे. लहान मुलगा बापाच्या ताटात जेवावयास बसताे आणि त्याच्या मुखात घास घालताे. तेव्हा बापाला किती आनंद हाेताे ! अहाे, आईचे दूध पीत असताना तिला बालक ढुशा देत असेल तर तिला अधिकच पान्हा ुटत नाही का?
Powered By Sangraha 9.0