नाम मुखी येते हाच नामाचा अनुभव

21 Dec 2022 13:00:30
 

Gondavlekar 
 
नामाचा अनुभव काेणता? नामाचा अनुभव नामाव्यतिरिक्त दुसऱ्या कशात पाहू नये, म्हणजे नामापासून दुसरे काही मिळवायचे आहे ही कल्पनाच नसावी. नाम मुखी येते हाच नामाचा अनुभव.ज्या प्रमाणात आपल्या हातून नामस्मरण घडले त्या प्रमाणात आपल्याला नामाचा अनुभव आला असे समजावे. अखंड नामस्मरण टिकले, की पुरा अनुभव आला. नामस्मरण करता करता चित्त एकाग्र हाेते. देहबुद्धी विसरून नाम घेणे हेच निर्गुण हाेणे आहे. मी काेण आहे हे कसे ओळखावे? ‘मी काेण आहे’ हे ओळखण्यास जडाने म्हणजे वाचेनेच नाम घेण्यास सुरुवात करावी आणि ते नाम अखंड घेण्याचा प्रयत्न करावा. मग ते मनाने अंतरात हाेऊ लागते.पहिल्यानेच आपल्या प्रयत्नाने मनाला नामाचे वळण लावण्याच्या नादी लागू नये, कारण ते ारच अवघड आहे. नाम घेता घेता देहाचा विसर पडल्यावर मी काेण आहे व देव काेण हे आपाेआप कळेल.
 
भगवंताच्या नामाचा नाद लागला तर दु:खाची जाणीव कमी हाेते. दु:खाची जाणीव नसल्यावर दु:ख असले म्हणून बिघडले कुठे? काळाेख्या रात्री जशी काठी आधार असते, तसे संसारात नाम आहे.खाचखळगे काठीच्या याेगाने टाळता येतात, तसे माेह, लाेभ इत्यादी संसारातल्या अडचणी नामाने समजतात आणि दूर करता येतात. विस्तवाजवळ तूप ठेवले की ते विरघळते, तसे नामाची शेगडी ठेवली की अभिमान वितळलाच पाहिजे. हाच नामाचा अनुभव. पण लाेक नामाबद्दल ऐकूनच घेत? नाहीत, जर काेणी ऐकून घेतले तर ते बिंबवून घेत नाहीत. त्याचे मनन करीत नाहीत, आणि मनन करून ज्यांना ते पटले, ते पटले असूनही नाम घेत नाहीत.
अडचणी असल्या तरी नाम घेता येते. म्हणून नामस्मरण न करण्याबद्दल सबबी सांगू नका. सबब सांगितली की त्यापासून लबाडी उत्पन्न हाेते, लबाडीतून आळस उत्पन्न हाेताे, आणि आळसाने सर्वनाश हाेताे.
 
आपण राेज उठल्यावर भगवंताचे स्मरण करण्याचा नियम ठेवावा. स्नान वगैरे गाेष्टी झाल्या तर कराव्याच, पण त्यांच्यावाचून अडून बसू नये.भगवंताचे स्मरण हे मुख्य आहे. अखंड नामस्मरण ठेवायला साेवळ्या-ओवळ्याचे बंधन नाही. अखंड स्मरणच साेवळे आहे.
उपासना काेणतीही असली तरी नामाशिवाय ती पचनी पडत नाही. महत्त्व नामाला आहे.निरनिराळ्या देशांतले अन्न निरनिराळे असू शकते, पण ते पचविण्याकरिता लागणारे पाणी इथून तिथून सर्व सारखेच. पाण्याशिवाय काेणतेही अन्न पचणार नाही. त्याप्रमाणे उपासनारूपी अन्नाला पचविण्यासाठी नामरूपी पाण्याची जरूरी आहे. म्हणून नामाला महत्त्व देऊन ते सतत घेण्याचा अभ्यासकरावा.कसाही प्रसंग आला तरी नामस्मरण साेडू नका.त्यातून परमात्मा हात देईल.
Powered By Sangraha 9.0