काही वेळा दुसऱ्या काेणी त्रास देण्याऐवजी आपल्या स्वत:मधील सहज दाेषांमुळे अनेक दु:खे कशी येऊ शकतात याचे वर्णन करताना ते म्हणतात की, माणूस एखादी महत्त्वाची किंवा माैल्यवान चीजवस्तू हरवताे. विसरताे, पाडताे किंवा चुकून त्याच्या हातून ती गाेष्ट नासते, फुटते, पडते किंवा काेठे ठेवली आहे हेच विसरून जाते. त्यामुळेही ती वस्तू जाऊन ताप हाेताे.जगामध्ये माणसाला फसविणारे आणि लुटणारे अनेक प्रकारचे लाेक असतात. श्रीसमर्थ संत असले तरी त्यांना अथक जनसंपर्कामुळे आणि विचक्षक बुद्धीमुळे त्या दुर्जनांचेही अनेक वर्ग माहीत हाेते. भुरटे चाेर, उचले, भामटे, किमयागार, भुरळ घालणारे, ठग, घरफाेडे, लुटारू दराेडेखाेर असे अनेक लाेक माणसाची धनदाैलत लांबवून त्याला दु:खी करून साेडतात.
आधिभाैतिक तापांची ही अनेक उदाहरणे देताना प्रपंचात अगदी अंतर्यामापासून दु:ख देणारी तीन शल्ये श्रीसमर्थ सांगतात. कुरूप, भांडखाेर आणि क्रूर पत्नी मिळणे; कन्येला तरुणपणीच वैधव्य प्राप्त हाेणे आणि मुलगा मूर्ख व दुराचारी निघणे या तिन्हींपैकी काेणत्याही एका गाेष्टीने माणसाचा संपूर्ण संसार दु:खमय हाेऊन जाताे. हा सुद्धा घरातीलच माणसांकडून हाेणारा म्हणून आधिभाैतिक तापच असताे, असे सांगून श्रीसमर्थ आपल्याला इत्नया अनंत दु:खांची मानवी जीवनात श्नयता असते हे दर्शवून देत आहेत आणि अर्थातच शरीर व ऐहिक गाेष्टींबद्दलचे आपले प्रेम व अभिलाषा कमी करण्याचा उपदेश करीत आहेत! - प्रा. अरुण गाेडबाेले, माे. 9822016299