ओशाे - गीता-दर्शन

02 Dec 2022 15:53:42
 
 
 

Osho 
कारण साेबत दाेनतीन माणसं उभी हाेती. एक पैसा दिला नाहीतर त्यांनी काय म्हटलं असतं, असा विचार करून ताे पैसा दिला हाेता, पण दिला हाेता. एक पैसा दिला हाेता- तेवढं मात्र स्थगित केलं नव्हतं.कारण काही असाे, एक पैसा भिकाऱ्याला दिला.’ त्या कराेडपतीच्या चेहऱ्यावर लगेच उजाळा आला. आशा वाटली की ‘चला, आता प्रवेश प्नका झाला.’ ताे ्नलार्क म्हणाला. ‘एवढ्याशा आधारावर प्रवेश कसा काय मिळणार बुवा? कारण हा पैसा सुद्धा खऱ्या अर्थानं भिकाऱ्याला दिला गेलेला नाही. म्हणून तर भिकारी एकट्या माणसाला बघून कधी भीक मागत नसतात.दाेन-चार मित्रांबराेबर असतांना पकडतात.त्यांना माहीत असतं, भिकाऱ्याला काेण घालताे भीक!
 
साेबत जी माणसं असतात त्यांच्यापुढे नाही म्हणायची लाज वाटते म्हणून आपण देता एक पैसा. मग दुसराही आणखी एक पैसा देताे.
ही आपसातली देवघेव झाली. भिकाऱ्याशी काही संबंध नसताे.’ ‘तरी पण याने एक पैसा दिला हाेता तर काय करावे?’ ताे ्नलार्क म्हणाला, ‘एकच उपाय आहे.हा एक पैसा यांना परत देण्यात यावा आणि त्यांना नरकाकडे परत पाठवण्यात यावं! भिकाऱ्यांला एक पैसा देऊन माेठा टे्निनकल पाॅइन्ट उभा केलाय यांनी. हे पण यांनी आणखी एकदा स्थगित केलं असतं तर काय बिघडलं असतं! निदान तांत्रिक गडबड तरी टळली असती.’ जे जे शुभ आहे ते ते आपण स्थगित करीत राहताे. जणू काही मेल्यावर करण्यासाठी! आणि जे जे अशुभ आहे ते ते आपण आजच्या आज करताे. उद्या करायला मिळेल का नाही याचा पत्ता नसताे ना!
Powered By Sangraha 9.0