आपण देहधारी असूनही देहरूप नाही अशी अवस्था आणण्याचा प्रयत्न करावा. आपण तरंगरूप आहाेत किंवा नाहीत असे कधी पाण्याला ज्ञान हाेते का? ते नेहमी पाणीच असते. तरंगांच्या निर्मितीमुळे वा त्याच्या नाशामुळे पाणी नाहीसे हाेत नाही. त्याप्रमाणे आपण दुसऱ्यांना देहधारी दिसलाे तरी आपण देहासह ब्रह्मस्वरूप हाेण्याचा प्रयत्न करावा.खरे म्हणजे देहाचे नावही उरवू नये. त्याची आठवणही हाेऊ नये. आपण एकदा ब्रह्मस्वरूप झाल्यावर देह, देश, काल हे सर्वच ब्रह्मरूप हाेतात. मग आणखी वेगळ्या ब्रह्मप्राप्तीच्या मार्गासाठी आपण कसे व काेठून जाणार? अर्जुना, जेव्हा घट ुटताे तेव्हा आकार नाहीसा हाेताे आणि त्याबराेबर आकाशाचा आकारही नाहीसा हाेताे.
म्हणून ध्यानात ठेव की, एका सच्चिदानंद परब्रह्मखेरीज दुसरे काहीच नसून आपले त्याच्याशी ऐक्य आहे.मीच परब्रह्म आहे असा एकदा बाेध झाला की मग काेणत्याही मार्गांचे संकट पडत नाही. म्हणून अर्जुना, तू याेगमुक्त व्हावेस, मग तू आपाेआपच ब्रह्मरूप हाेशील, स्वर्गादि कामनांच्या इच्छेस फसणार नाहीस.विषयभाेगांना भुलणार नाहीस इंद्रादि देवांचे राज्यही तू त्याज्य समजशील. अशी ही अवस्था सर्व पुण्यांची बेरीज झाली तरी तुला प्राप्त हाेईल की नाही हे सांगता येणार नाही. ज्या सुखाचा वीट येत नाही, जे कधी संपत नाही, त्याला परब्रह्माचे महासुख म्हणतात. हे सुख शंभर यज्ञ करणाऱ्या इंद्रालाही कधी प्राप्त हाेत नाही.