वाच्यार्थ:अनुपम साैंदर्यामुळे सीतेचे अपहरण झाले. अति अहंकाराने रावणाचे अध:पतन झाले. अतिदानशूरतेमुळे बळीराजा वचनबद्ध झाला; म्हणून सदासर्वकाळ ‘अतिरेक’ वर्ज्य करावा.
भावार्थ : ‘अति तेथे माती’ ही म्हण सर्वांनीच लक्षात ठेवायला हवी.
1. सीता : साेज्ज्वळ, सुशील सीता ही अत्यंत सुंदर हाेती. त्यामुळेच रावण तिच्यावर माेहित झाला व त्याने तिचे अपहरण केले. पुढे काहीकाळ लाजिरवाणे आणि बंदिवासातील जीवन तिच्या वाट्याला आले.
2. रावण : रावण महाबलाढ्य हाेता. ताे शिवभक्तही हाेता; पण तपाचे तेज चांगल्या गाेष्टींसाठी न वापरता ते त्याने ग्रह, देवांना बंदी बनविण्यासाठी वापरले; त्याला त्याच्या शक्तीचा अतिशय अहंकार हाेता. त्यामुळेच त्याला सीतेचे अपहरण करण्याची बुद्धी झाली आणि शेवटी प्रभू रामचंद्रांच्या हातून त्याचा विनाश झाला.