निंबाचिया झाडा साखरेचें आळें । बीज तैसीं फळें येती तया ।।1।।

16 Dec 2022 16:31:49
 

saint 
 
माणूस जेव्हा दुरुपयाेगासाठी बुध्दी वापरताे, तेव्हा त्यास माणूस म्हणायलाही लाज वाटते. माणूस या शब्दाला लाजवणारे भरपूर लाेक समाजात आहेत. असे लाेक इतरांच्या नजरेतून उतरलेले असतात. पण स्वत:च्या नजरेत मात्र उच्चस्थानावर असतात.इतरांच्या नजरेतून उतरण्यापेक्षा स्वत:च्या नजरेतून उतरणे अत्यंत लाजिरवाणे असते. हे सत्य असले तरी स्वत:च्या नजरेतून उतरलेला माणूस जर सकारात्मक दृष्टिकाेनातून स्वत:कडे पाहू लागला तर ताे तत्काळ सुधारताे. पण कांही लाेक स्वत:ची नजरच स्वभावाशी एकरूप करून टाकत असतील तर त्या नजरेतून उतरण्याचा प्रश्न उद्भवेलच कसा ? अशा अत्यंत वाईट, खडूस स्वभावाच्या लाेकांना काेणाचाही सहवास लाभला तरी त्यांच्या वर्तनात बदल हाेत नाही.
 
बाह्यांगी अत्यंत चांगल्यांचा सहवास लाभला तरी अंतरंगी खऊटपणा जाेपासणाऱ्यांचे वर्तन चांगले हाेण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. निंबाच्या झाडाला साखरेचे आळे करून पाणी घातले तरी त्याला फळे ही मूळ गुणानुसार कडूच येतात. त्याप्रमाणे अंतरंगच कडवट असेल तर बाह्य सहवासाचा उपयाेग हाेत नाही. या अनुषंगाने बाेलतांना तुकाराम महाराज म्हणतात, निंबाचिया झाडा साखरेचें आळें । बीज तैसीं फळे येती तया ।। जय जय राम कृष्ण हरी.
- डाॅ. विजयकुमार पं. फड श्री माऊली निवास, श्री माऊली नगर, जालना माे. 9422216448
Powered By Sangraha 9.0