आयुष्यात मला आपण एकटेच समजूतदार माणूस भेटलात. आपण माझ्या हातून झालेल्या अपराधांना जबाबदार धरलंय ते दारूला, मला नाही.माेठी गमतीची गाेष्ट आहे. आपणही कधी पकडले गेलात, तर असे म्हणू नका, ‘इंद्रियांनी माझ्याकडून करून घेतले, मी काय करणार?’ त्यादिवशी आपली अवस्था या माणसासारखीच असेल. इंद्रिये आपणाकडून काहीएक करवून घेऊ शकत नाहीत, तरीपण करून घेताहेत, कारण आपण आपली मालकी कधी सांगितलीच नाहीत. ‘मी मालक आहे.’ अशी घाेषणा आपण कधी केलीच नाही.
लक्षात ठेवा, मालकीची घाेषणा करावी लागते आणि हेही लक्षात ठेवा की मालकी फुकटात मिळत नाही. मालकीसाठी श्रम करावे लागतात. आणखीही एक गाेष्ट लक्षात घ्यायला पाहिजे की, जी मालकी विनाश्रमांची मिळेल ती इंपाेटंट, नपुंसक असते. तिच्यात काही बळ नसते. श्रमाने मिळणाऱ्या मालकीची शाेभा काही वेगळीच असते.रथाच्या घाेड्यांपैकी उत्तम घाेडा काेणता? तर ज्याला लगाम लावला नसेल आणि जाे रथाला धाे्नयात आणील ताे लगामच नसलेला घाेडा खरा शानदार.