ओशाे - गीता-दर्शन

14 Dec 2022 12:57:39
 

Osho 
 
या थट्टेचं उत्तर हाेतं द्राैपदीला नागवणे-प्रचंड युद्धांमागेसुद्धा अगदी छाेटीशी कारणं आहेत. एकदा का इंद्रियांनी आपल्याला पकडलं की मग ती आपल्याला शेवटापर्यंत नेतात. त्यांचा आपला तार्किक निष्कर्ष असताे. मग ती मध्येच साेडायची नाहीत. आपण लाख म्हटलं, ‘थट्टेचं काय एवढं! एका क्षुद्र अपमानासाठी एवढी लढाई? पण मग इंद्रिये कुठली थांबतात! ती म्हणतात गाेष्टी या थराला आल्या ना! मग आता मागचं पाऊल कशासाठी! ती आपणाला आणखी पुढे-आणखी पुढे अशीच ढकलत राहतात.जनावरांना त्यांच्या गळ्यात दाेरी बांधून जसं ओढतात, तशीच इंद्रिये माणसाला खेचतात.
 
म्हणून तंत्रविज्ञानात तर माणसाला पशू असेच म्हटले आहे. पशू याचा अर्थ पाशांनी ज्याला आवळले आहे असा. साध्या शब्दात पशू याचा अर्थ-ज्याच्या गळ्यात दाेरी बांधली आहे असा हाेताे. तंत्राचे ग्रंथ म्हणतात, ‘पशू आणि पशुपती या दाेन प्रकारची माणसं असतात.इंद्रिये ज्यांना गळ्यात बांधून खेचतात ते पशू, अन् जे इंद्रियांचे मालक झाले ते पशुपती.कृष्णही तेच सांगत आहे. एका गहन तांत्रिक सूत्राची व्याख्या त्याने इथं केलीय. ती अशी-आपली इंद्रिये आणि शरीर यांचा मालक आहे ताेच आपला स्वत:चा मित्र असताे. स्वत:च्या मैत्रीवर ताेच माणूस भरवसा ठेवू शकताे.
Powered By Sangraha 9.0