भाव धरी तया तारील पाषाण । दुर्जना सज्जन काय करी ।।2।।

13 Dec 2022 16:12:38
 
 

saint 
 
सज्जनांच्या सहवासात गेल्याने दुर्जनातही परिवर्तन हाेते, हे सत्य आहे. पण आपल्यात परिवर्तन हाेऊच द्यायचे नाही, आपण म्हणताे तेच खरे आहे, अशी मनाशी खूणगाठ बांधून बसलेल्या भावहीन लाेकांना सज्जनही कांही करू शकत नाहीत. ऐकून घेण्याची मानसिकताच नसेल तर अशा मूठभर लाेकांना सुधारण्यात वेळ घालवायचा म्हणजे दुसरीकडे हजाराे लाेकांकडे दुर्लक्ष करावे लागते. याचा अर्थ असा नाही की सज्जनांनी अशा खाेडसाळ, जिद्दी, हेकेखाेर दुर्जनांना सुधारण्याचा प्रयत्नच करू नये. देव मानणाऱ्यापैकी अनेकांची भावना, श्रध्दा ही पाषाणाच्या मूर्तीवर असते. यांची भावना मूर्तीवर नसावी असे निश्चितच नाही.
 
पण या भक्तांनी अशीच श्रध्दा, भावना आपल्या कुटुंबातील सदस्यावर, आजूबाजूच्या शेजाऱ्यावर, अडीअडचणीत सापडलेल्या जीवावरही जाेपासावी. एकीकडे सुनेचा, सवतीच्या मुलांचा छळ करायचा आणि देवघरातल्या पाषाण मूर्तीला श्रध्देने पुजायचे म्हणजे हे दुर्जनत्व हाेय. मंदिरात जाऊन मूर्तीवर तेल तुपाचा वर्षाव करणारे मूर्तीसमाेर भरपूर फळे, पंचपक्वान्न ठेवणारे मंदिराच्या दारासमाेर पाेटासाठी हात पसरून बसलेल्यांकडे दुर्लक्ष करीत असतील तर यांच्या अशा वर्तनाला शुध्द श्रध्दा म्हणणे संयु्नितक हाेणार नाही. जय जय राम कृष्ण हरी.
- डाॅ. विजयकुमार पं. फड श्री माऊली निवास, श्री माऊली नगर, जालना माे. 9422216448
Powered By Sangraha 9.0