ओशाे - गीता-दर्शन

13 Dec 2022 16:05:25
 
 
 

Osho 
 
माेठ्यातल्या माेठ्या लढायांमागेसुद्धा कारणं असतात, ती अगदी फडतूस! अगदी क्षुद्र कारणं असतात.राम-रावणांचीच लढाई असू द्या की, अगदी नगण्य कारण असतं. महाभारताचं एवढं माेठं युद्ध झालं, त्यातूनच ही गीता फळण्याची संधी आली. पण त्या युद्धाचंद्धा कारण अगदी छाेटसं झालं. माहीत आहे काय कारण घडलं ते?’ अगदी छाेटंसं- द्राैपदीचं एक छाेटसं हास्य, सगळ्या युद्धाचं कारण झालं.पांडवांनी एक घर बांधलं हाेतं-माेठं आलिशान आणि कलापूर्ण. त्यात काही फसवी ठिकाणं हाेती. आरसे असे लावले हाेते की जिथे पाणी नव्हते तिथे पाणी आहे असे भासे आणि जिथं पाणी हाेतं तिथं जमीन भासे. जिथे दरवाजा आहे तिथं भिंत अन् जिथ भिंत आहे असं वाटे तिथं दरवाजा असायचा. ती एक निष्पाप गंमत हाेती, तिच्याआधारे एवढं माेठं युद्ध हाेईल असं कुणालासुद्धा जन्मात वाटलं नसतं.. काेण विचार करताे?
 
छाेटीशी गंमत चेष्टा हाेती ती, दीर- भावजयीमधला थाेडा खट्याळ विनाेद म्हणा हवा तर. अशी काही झगड्या भांडणाची गरज नव्हती.तिथं दुर्याेधनाला आमंत्रण हाेतं. ताे आल्यावर जेव्हा भिंतीला आदळू लागला आणि पाण्यात पडू लागला, तेव्हा द्राैपदी हसली निश्चिंतपणे..बाेलता बाेलता तिनं थट्टेनं कुणाजवळ तरी म्हटलं, ‘आंधळ्याचीच मुलं! असं आदळण्यात काही चूक आहे काय?’ जेव्हा दुर्याेधनाच्या कानावर ही बातमी पडली की, त्याला आंधळ्याचा मुलगा म्हटलं गेलंय, तेव्हाच युद्धाचं बीज पेरलं गेलं. आंधळ्याचा मुलगा-छाेटीशी मस्करी-पुरेशी ठरली युद्धाग्नी भडकावयाला. या अपमानाचा बदला घ्यायला पाहिजे ना!
Powered By Sangraha 9.0