संसारात राहून संसारापेक्षा वेगळे राहणे, अत्यंत अवघड आहे. ज्यांना आपण मी, माझे, माझी म्हणताे त्या सर्वांना आपल्यापासून वेगळे करायचे आणि आपण त्यांच्यापासून वेगळे व्हायचे ही कल्पनाही संसारात अडकलेल्या जीवाला पटणे शक्य नाही. उलट या जीवाला वाटते की आपण यांच्यासाठी व हे आपल्यासाठीच आहेत. मी. माझे, माझी आदीमध्ये गुंतलेल्या या जीवाला मुळात त्याच्या स्वत:चा खरा परिचय झालेला नसताे म्हणून त्याला हे सर्व मायाजाळ आपले वाटू लागते. हे सर्व आपले वाटणे म्हणजे आपण खऱ्या आपणापासून दुरावणे हाेय.
आपण काेण आहाेत ? हे समजण्यासाठी ज्याला या प्रश्नाचे उत्तर समजले आहे व ज्याला त्याच्या खऱ्या स्व चा अनुभव आला आहे, असा भेटावा लागताे. असा महात्मा स्वत: हाेऊन आपला शाेध काढत येत नसताे, तर अशांचा शाेध आपणाला घ्यावा लागताे. चार लाेक एखाद्याला गुरू मानतात किंवा एखाद्याच्या मागे पुढे खूप लाेक राहतात, त्याची प्रसिध्दीही खूप असते, त्याचे चमत्कारही चर्चेत असतात म्हणून त्यास आपण गुरू करावे असा विचार याेग्य नसताे. सद्गुरूची प्रचिती बाह्य रंगाने येण्यापेक्षा अंत:रंगाने यावी.
जय जय राम कृष्ण हरी.
- डाॅ. विजयकुमार पं. फड श्री माऊली निवास, श्री माऊली नगर, जालना माे. 9422216448