ओशाे - गीता-दर्शन

10 Dec 2022 13:47:23
 
 

Osho 
 
ज्यांच्यापाशी नावालादेखील आत्मा नाही, त्यांना आवाज ऐकू येताहेत! आणि हे आवाज देखील बदलून जातात. सकाळी एक आवाज ऐकू येताे तर संध्याकाळी दुसराच आवाज.आत्मे पण माेठा राजकीय स्टंट खेळतात! आपण कधी आत्म्याचा आवाज ऐकला आहे का? आपण पुढारी नसाल तर कधीच ऐकला नसेल. आपणाला फ्नत इंद्रियांचेच आवाज ऐकू येत असतात. कधी एक इंद्रिय म्हणते, ‘हे पाहिजे’ कधी दुसरे इंद्रिय म्हणते, ‘ते पाहिजे’ कधी तिसरे इंद्रिय म्हणते, ‘हे नाही मिळाले तर आयुष्यच फुकट.’ चवथे इंद्रिय म्हणते, ‘लाव, लाव, सगळी श्नती पणाला लाव या गाेष्टीवर. ही गाेष्ट म्हणजेच जीवन सर्वस्व.’ पण जे जीवन आत लपून आहे त्याचा आवाजही कधी ऐकलात का? त्याला कुठला आवाज नाहीये.कृष्णाचं म्हणणं आहे की, अशी अवस्था ही आपण आपलेच शत्रू असल्याची अवस्था आहे.
 
अन् गुलामी तर फारच भयंकर असते. खुद्द इंद्रियांना जे नकाे असतं तेही इंद्रिये माणसाकडून करवून घेतात. आपल्यालाही याचा कित्येकदा अनुभव आला असेलच. आपण कित्येकदा लाेकांना म्हणता की, ‘अरे, हे काम माझ्याकडून कसं झालं काही समजत नाही. हे मला करायचं नव्हतं तरी घडून गेलं. इन स्पाईट ऑफ मी. मला नकाे असतानाही मीच कसं काय केल?’ आपणांस करायचं नव्हतं तर कशाला केलं मग? आपण म्हणताे, ‘तुमच्या थाेबाडीत मारायची माझी अजिबात इच्छा नव्हती, पण काय करू? असं वाटलंही नव्हतं, तसा माझा हेतू ही नव्हता.भाव पण उठला नव्हता’, पण मारलं हे तर खरं आहे. पण मग हे मारणं काेणाकडून झालं? मारल्यानंतर म्हणताेय, ‘असं वाटलही नव्हतं, हेतूही नव्हता, भावपण नव्हता,’ मग काय झालं? नाही, आता कुणी मालकच नाही. दरवाज्यावर एक नाेकर हाेता त्याने थाेबाडीत मारली, दुसरा नाेकर क्षमा मागताेय.
Powered By Sangraha 9.0