नामात प्रेम येण्यासाठी खरी कळकळ पाहिजे

10 Dec 2022 13:48:47
 
 

Gondavelakr 
 
नामात प्रेम का येत नाही, हा प्रश्न बहुतेकजण विचारतात. पण थाेडासा विचार केला तर असे लक्षात येईल की हा प्रश्नच बराेबर नाही. मूल न झालेल्या बाईने, ‘मुलाचे प्रेम कसे येईल?’ असे विचारण्यासारखाच हा प्रश्न आहे. मूल झाले की प्रेम त्याच्याबराेबरच येत असते.
तेव्हा, ‘मुलाचे प्रेम कसे येईल’ हा प्रश्न करण्याऐवजी, ‘मूल कसे हाेईल’ याचाच विचार करणे बराेबर ठरेल.आपणसुद्धा प्रश्न करायचाच असेल तर ‘नामात प्रेम कसे येईल’ असा करण्याऐवजी, ‘मुखी नाम कसे येईल’ असा प्रश्न करणे बराेबर हाेईल. मुखी नाम यायला वास्तविक आडकाठी काेणाची आहे? दुसरी काेणाचीही नसून आपली स्वत:चीच आहे.वास्तविक, एकदा नाम घ्यायचे ठरवून सुरुवात केली की झाले. पण तसे हाेत नसेल तर दाेष दुसऱ्या काेणाचा नसून आपला स्वत:चाच आहे. म्हणून नाम घेणे हे आपले काम आहे; मग त्याच्या पाठाेपाठ येणे हा प्रेमाचा धर्मच आहे. जसे आईच्या बाबतीत, मूल आणि प्रेमाचा पान्हा ही निराळी असूच शकत नाहीत, तसे नाम आणि त्याचे प्रेम ही एकमेकांना साेडून राहूच शकत नाहीत.
 
ह्यावरून एक गाेष्ट अशी ठरली की, ‘प्रेम का येत नाही’ याचे उत्तर आमच्याजवळ आहे, आणि ते म्हणजे, ‘नाम घेत नाही म्हणून.’ यावर काेणी असे म्हणेल की, आम्ही नाम घेताेच आहाेत, तरीही प्रेम का येत नाही? हे विचारणे ठीक. पण आता आम्ही जे नाम घेताे म्हणून म्हणताे, त्याचा विचार केला तर काय दिसेल? पाेटी जन्माला आलेल्या मुलाबद्दल जसा कळवळा असताे, तसा नामाबद्दल आपल्या ठिकाणी कळवळा नसताे. सर्व संतांनी किंवा आपल्या गुरूने, नाम घ्यावे असे सांगितल्यामुळे आपण ते घेताे, किंवा दुसरे काही करायला नाही म्हणून घेताे, इतकेच. अर्थात, तसे घेतले तरी आज ना उद्या आपले काम हाेईलच. पण ‘प्रेम का येत नाही’ असा प्रश्न विचारपूर्वी, आपण नाम किती आस्थेने घेताे हा प्रश्न स्वत:ला विचारणे जरूरी आहे.
 
एखाद्या बाईला ार दिवसांनी मूल झाले तर त्याच्या बाबतीत तिची जी स्थिती हाेते ती नामाच्या बाबतीत आपली हाेणे जरूर आहे. जाे खरा साधक आहे त्याने स्त्रियांना भिऊनच वागावे; जाे सिद्ध आहे त्याने देखील स्त्रियांपासून दूरच राहावे, पण ताे स्त्रियांत वागला तरी त्याला दाेष नाही, मनाने ताे अलिप्तच असताे. आपल्या देहाची वाढ जशी आपल्याला न कळत हाेते, तशी आपली पारमार्थिक उन्नतीही आपल्याला न कळत झाली पाहिजे.ती कळली तर सर्व ुकट जाण्याचा संभव असताे. परमार्थ अगदी साेपा आहे, पण ताे याेग्य मार्गाने केला पाहिजे.एखादी गाठ साेडविण्यासाठी दाेरी ओढायची हे माहीत पाहिजे, नाहीतर जास्तच गुंतागुंत हाेते. तसेच परमार्थाचे आहे. परमार्थात ‘मिळविण्यापेक्षा’ मिळविलेले ‘टिकविणे’ हेच जास्त कठीण आहे. ज्याला ‘मी काही तरी झालाे’ असे वाटते ताे काहीच झालेला नसताे. अशा माणसाने ारच सांभाळले पाहिजे.
Powered By Sangraha 9.0