पत्र तिसावे
धर्माने चालणाऱ्या लाेकांवर पुष्कळदा पेचप्रसंग येताे, पण धर्माचा बारकावा न कळल्यामुळे ते त्या पेचप्रसंगातून सुटत नाहीत. महाभारतात कृष्णच असा आहे की त्याला धर्माचा बारकावा समजताे व ताे पेचप्रसंगावर मात करताे.कृष्णाचे तत्त्वज्ञान म्हणजे मानवी जीवनातील पेचप्रसंगाचा काेष आहे. एखादा शब्द नडला म्हणजे आपण काेषात पाहताे व आपली अडचण दूर हाेते.मानवी जीवनात जेव्हा जेव्हा पेचप्रसंग अथवा कठीण समस्या निर्माण हाेतात तेव्हा तेव्हा कृष्णाचे तत्त्वज्ञान पहावे म्हणजे त्या पेचप्रसंगावर वा त्या समस्येवर आपणाला ताेडगा सापडताे.पांडव वनवासात गेल्यावर कृष्ण त्यांना भेटण्यास गेला.कृष्णाने पांडवांचे सांत्वन केले व म्हटले- ‘तेरा वर्षांनंतर दुर्याेधनाने तुमचे राज्य परत दिले नाही तर काय वाटेल ते करून मी न्याय प्रस्थापित करीन व तुमचे राज्य तुम्हाला परत मिळवून देईन.’ *** कृष्ण द्वारकेला परत आला. ह्यावेळी ताे सत्तर वर्षांचा हाेता. पूर्वीच्या कल्पनेप्रमाणे एक ते एकवीस वर्षेपर्यंत बालपण, एकवीस ते सत्तर वर्षेपर्यंत तरुणपण व सत्तर वर्षानंतर म्हातारपण.
कृष्णाने आता माेक्षाचा विचार सुरू केला. औपनिषद तत्त्वाचे ताे मनन करू लागला, पांडव वनवासात व अज्ञातवासात असताना कृष्णाने तेरा वर्षांचा काळ विचार मंथनात घालवला. त्याने या काळात खूप माेठी तपश्चर्या केली. छांदाेग्य उपनिषदावरून आपणास कळून येते की कृष्णाने घाेर अंगिरसापासून आत्मविद्या ग्रहण केली.कृष्णाने निरनिराळ्या विचारांचे समुद्रमंथन करून मानवी जीवनातील हर एक समस्यांवर उपयाेगी पडणारे अमृत बाहेर काढले. हेच गीतामृत हाेय.भाेगाच्या टाेकास गेलेला समाज ज्याप्रमाणे अध:पतित हाेताे, त्याप्रमाणे त्यागाच्या टाेकास गेलेला समाज देखील अध:पतित हाेताे. भाेग व त्याग, प्रवृत्ति व निवृत्ति ह्यांचा जाे सुवर्णमध्य साधताे ताेच या जगात कृतार्थ हाेताे.
दादाेबांच्या व्याकरणात पहिले वा्नय असे आहे की-- शुद्ध कसे बाेलावे व शुद्ध कसे लिहावे हे व्याकरण शिकल्याने समजते.
याच चालीवर असे म्हणता येईल की - प्रवृत्ती निवृत्तिरूप कशी करावी, व निवृत्ती प्रवृत्तिरूप कशी करावी हे कृष्णाचे तत्त्वज्ञान शिकल्याने समजते.कृष्णाचे तत्त्वज्ञान असे आहे की -- संसार नाही साेडणेचा; संग साेडणेचा कर्म नाही साेडणेचे; कामना साेडणेची.
कर्म जे करावयाचे ते सकाम असता कामा नये, निष्काम असले पाहिजे.प्रपंच साेडून परमार्थ नाही करावयाचा तर प्रपंच असा करावयाचा की प्रपंचच परमार्थ झाला पाहिजे.मुलीचे कार्यक्षेत्र सासरी असते पण तिचा ओढा माहेरी असताे. मानवी जीवनाचे सूत्र म्हणजे- प्रवृत्ती सासर निवृत्ती माहेर.वैदिक वाङ्मयाचा अभ्यास केला म्हणजे तुला असे कळून येईल की