ओशाे - गीता-दर्शन

09 Nov 2022 17:52:27
 
 

Osho 
 
त्याने येशू ख्रिस्तांच्या डाेळ्यात पाहिले, त्यांचा आनंद, त्यांची शांती याचे अवलाेकन केले.त्याने लगेचच त्यांचे पाय धरले आणि म्हटले, ‘मी शपथ घेताे की, आता मी या बैलांना शिव्या देणार नाही.’ अन् येशू दुसऱ्या गावाला निघून गेले. दाेन चार दिवस त्या शेतकऱ्याने स्वत:ला चांगलेच थाेपवून धरले. पण शपथांनी जगातल्या सगळ्या गाेष्टी कशा थांबवणार? अशा प्रतिज्ञा करून सगळ्या गाेष्टी झाल्या असत्या तर मग काय? गाेष्टी उमजल्या तर मग फरक पडताे. येशू ख्रिस्तांच्या प्रभावाने शपथ घेतली हाेती. बळेच घेतली हाेती. दाेन-चार दिवस त्याने स्वत:ला थाेपवले, कसेबसे.त्या अवधीत शपथेचा प्रभाव क्षीण झाला.
 
ताे परत आपल्या पूर्वपदावर आला. अन् त्याने विचार केला, ‘छे, यात काही अर्थ नाही. अशाने पंचाईत हाेईल आपली. बैलगाडी चावलणे कठीण झाले आहे आपल्याला... गाडी चालवण्याकडे लक्ष द्यायचं, की शिवी द्यायची नाही याकडे-असा अवघड मुद्दा आहे. बैलांना जुंपायचे, की मलाच जुंपायचे? बैलांना सांभाळायचे की स्वत:ला? ही एक माेठी कटकटच झाली म्हणायची.’ त्याने परत आपले शिव्या देणे चालू केले. चार दिवसांचे उट्टे त्याने एका दिवसात काढले. भराभरा शिव्या ओकल्यावर मग कुठे मामला जरा थंड झाला. मग मनाला जरा हलके वाटले. तीन चार महिन्यांनंतर येशू त्याच गावातून परत निघाले हाेते. ताेच शेतकरी रस्त्यात पुन: भेटेल असे त्यांच्या ध्यानीमनी पण नव्हते. पण ताे दिसलाच. त्याची आपली बैलांवर शिव्यांची सरबत्ती चालूच हाेती.
Powered By Sangraha 9.0