धाेंड्याला दिलेली शिवीसुद्धा एक बीज बनेल.काेणाला शिवी दिली हा मुद्दा नाही. मुद्दा एवढाच की आपण शिवी दिली आहे अन् ती परतून येणार आहे.काेणाला शिवी दिली याचं महत्त्व नाहीये. ती शिवी परत येईल हे मात्र न्नकी. मी असं ऐकलं आहे की एकदा एक माणूस येशूंकडे आला. खेड्यातला चारचाैघासारखाच ताे एक शेतकरी हाेता. बैलांना बैलगाडीला जुंपून शिव्या देण्यात हा माेठा पटाईत.येशू ख्रिस्त गावातल्या रस्त्यााने जात आहेत, हा माणूस गाडीला बैल जुंपून, माेठ्या गलिच्छ शिव्या बैलांना देत चालला आहे. त्याचे शिव्या देणे अशा काही विशिष्ट प्रकारे चालू आहे की त्यांत त्याला माेठी गाेडी, माेठा रस येत आहे असे दिसते.
येशू त्याला थांबवून म्हणतात, ‘ए वेड्या! तू हे काय करताेयस, तुला काही कळतंय काय?’ शेतकरी म्हणाला, ‘बैल मला उलट्या शिव्या देणार थाेडाच? ताे माझे काय वाकडे करील?’ या माणसाचं हे म्हणणं ठीक आहे. आपलेही गणित बराेबरच असेच असते. जाे माणूस शिवी परतून देऊ शकत नाही, त्याला शिवी द्यायला आपल्याला काय हरकत? म्हणून आपल्यापेक्षा दुबळ्यांना आपण सगळे शिव्या देताे. म्हणून तर आपण वेळ-अवेळ न बघता, जरूर नसले तरी शिव्या देताे. आपल्याहून काेणी कमजाेर दिसला की केव्हाएकदा त्याला सतावून घेताे असे आपल्याला हाेते.येशूंनी त्याला म्हटले, ‘या बैलांना तुझ्या शिव्या परत करता आल्या असत्या तर बरं झालं असतं. त्यात कमी धाेका हाेता. कारण लगेच देवाण-घेवाण हाेऊन प्रकरण संपलं असतं. पण हे बैल काही शिव्या देऊ शकणार नाहीत. शिव्या मात्र अवश्यच उलटून येणार आहेत. या शिव्या आधी बंद कर बघू.’