इंग्लंडमधील वाॅल्वर हॅम्प्टन येथे राहणाऱ्या 49 वर्षांच्या मार्क डबास नावाच्या व्य्नतीने तब्बल 1 काेटी 27 लाख रु. खर्च करून 700 कबरींसाेबत फाेटाे काढले आहेत. त्याचा हा छंद आहे. या 700 कबरींपैकी 100 ब्रिटनमधील आहेत. मार्क डबासला राजकीय नेते, चित्रपट कलाकार, क्रीडा व इतिहास क्षेत्राशी संबंधित प्रसिद्ध लाेकांच्या कबरीवर जाण्याचा छंद आहे. मार्कचे म्हणणे असे की, या लाेकांनी जगाचा निराेप घेतला आहे. पण मला त्यांच्या कबरीजवळ गेलाे की, त्यांना भेटल्यासारखे वाटते.