लेकुरें उदंड जाली। ताे ते लक्ष्मी निघाेन गेली ।।1।।

05 Nov 2022 16:18:27
 
 

Saint 
 
श्री समर्थांच्या चतुरस्त्र बुद्धीची अलाैकिकता दर्शविणारी ही ओवी आहे.‘‘छाेटे कुटुंब म्हणजेच सुखी कुटुंब’’ हा कुटुंब कल्याणाचा मंत्र आपल्याला विसाव्या शतकात आठवला. आजही अगदी प्रत्येक अर्थसंकल्पात त्यासाठी तरतूद केली जाते; पण श्रीसमर्थांची दूरदृष्टी अशी की त्यांनी तीनशे वर्षे आधीच हा उपदेश अतिशय काव्यात्म पद्धतीने करून ठेवलेला आहे. मागील कथाभाग पुढे सांगताना ते म्हणतात की, त्याला पहिले अपत्य नवसाने झाले खरे, पण पुढे मुलांचे लेंढारच पाठीमागे लागले. एक पाेर खेळते आहे, दुसरे रांगत आहे तर तिसरे आईच्या पाेटात आहे अशी अवस्था हाेऊन त्याच्या घरात पुत्र व कन्या यांची दाटीच दाटी झाली.
 
एक कर्ता पुरुष मिळविता आणि खाणारी ताेंडे पुष्कळ अशी स्थिती झाल्यावर मिळवलेला पैसा त्याला कसा पुरणार? त्याची स्थिती हलाखीची व दारिद्र्याची झाली आणि या सगळ्या प्रजावळीत दाेन घास खाण्याचीही पंचाईत पडू लागली. हे पेंढार माेठे हाेऊ लागले तसा दिवसेंदिवस खर्च वाढू लागला आणि येणारे उत्पन्न मात्र तेवढेच राहिले. जमाखर्चाची ताेंडमिळवणीच जेथे हाेईना तेथे काही पैसे लग्नकार्यासाठी शिल्लक पडणे अश्नयच झाले. त्यामुळे माेठ्या झालेल्या मुलांना मुली सांगून येऊ लागल्या आणि कन्याही उपवर झाल्या.पण लग्नकार्यासाठी हाती पैसा तर काहीच नाही.
Powered By Sangraha 9.0