ओशाे - गीता-दर्शन

05 Nov 2022 16:17:42
 
 

Osho 
 
राेजच्याराेज मनावर दु:खाचे काटे तर पसरतच जातात आणि आनंदाची फुले उमललेली मात्र कुठेच दिसत नाहीत.दु:खांचे माेठमाेठे दगड आपल्या पायाला बांधले जातात. पण ज्या आनंदाच्या शाेधात आपण आहाेत, त्या आनंदात पाय नृत्य करू शकत नाहीत. मग त्याला आपणच, हाे आपणच-कारण आहाेत. दुसरे तिसरे काेणीही नाही-काही ना काही-काहीही चुकीचे, बीज आपण पेरून टाकताे. या चुकीच्या पेरणीतच आपण आपले शत्रू सिद्ध हाेताे. आपण काय पेरत आहाेत याचा विचार आपण पेरतानाच केला पाहिजे.
 
एखाद्या क्राेधाचे बीज पेरून शांतीची फळे मिळवू पहावीत किंवा तिरस्काराची बीजे पेरून प्रेमाची फळे मिळवू पहावीत किंवा सभाेवार शत्रूच शत्रू पसरवित राहणाऱ्याला सगळेजण आपले मित्र व्हावेत असे वाटावे, ही माेठी आश्चर्याची गाेष्ट आहे. शिव्यांची लाखाेली अवतीभाेवती सतत करीत राहणाऱ्यांवर आकाशातून शुभाशीर्वादांची पुष्पवृष्टी कशी हाेणार? पण माणूस अशा इंपाॅसिबल डिझायर, अश्नय इच्छा करताे. मी शिव्या देत रहावे आणि इतरांनी मला आदर देत रहावे, अशी असंभव कामना आपल्या अंतरात सतत चालू असते.
 
मी सगळ्यांचा तिरस्कार करावा, पण बाकी सगळ्यांनी मात्र माझ्यावर प्रेम करावे. मी काेणावरही विश्वास ठेवू नये, माझ्यावर मात्र सर्वांनी विश्वास ठेवावा. मी सर्वांना फसवले तरी चालेल, पण मला मात्र काेणी फसवता कामा नये. मी सगळ्यांना दु:खी केले तर काहीच गैर नाही, इतर सगळ्यांनी मात्र मला दु:ख देता कामा नये. हे अश्नय आहे. आपण जे पेरू तेच आपल्याकडे परत येईल. जीवनाचे सूत्रच असे आहे की आपण जे फेकताे तेच आपणावर परतून येते. आपण फेकलेले ध्वनीच चारीबाजूंनी प्रतिध्वनीत हाेऊन आपल्याला परत ऐकायला मिळतात. उशिर लागताे.
Powered By Sangraha 9.0