घ्यावें जेणें नये तुटी । बीज वाढे बीजा पाेटी ।।

04 Nov 2022 18:18:48
 
 
 

saint 
मानवी जीवनात देवाण घेवाणीला अनन्यसाधारण महत्व आहे. प्रत्येकाला केव्हा ना केव्हा, कशाची का हाेईना पण देवाणघेवाण ही करावीच लागत असते. इतरांना देणे जसे अवघड आहे, तसे इतरांकडून घेणेही अवघड आहे. आपल्या भारतीय समाजात अनेक ज्ञानी लाेक आहेत. पण या सर्व ज्ञानी, अनुभवी लाेकांना इतरांना त्यांच्याकडील ज्ञान देता येतेच असे नाही.सर्वांनाच इतरांना देण्याचे काैशल्य असते तर समाजात अंधश्रध्दा, अज्ञान टिकून राहिलेच नसते. अनेक ज्ञानी लाेकांना घमंड असताे.मी माझ्याकडील काेणाला कांहीही देणार नाही. अशा संकुचित वृत्तीने हे लाेक त्यांच्याकडील ज्ञान त्यांच्याकडेच ठेवतात. काहींना आपल्याकडील ज्ञान आर्थिक व्यवहारातूनच द्यावे वाटते. कांहीना इतरांना ज्ञान देण्याची कला नसते.
 
या ज्ञानी, अनुभवींपैकी कांही लाेक भाेळसट स्वभावाचे असतात. हे लाेक जेव्हा इतरांना ज्ञान देण्याचा प्रयत्न करतात, तेव्हा लाेक यांनाच वेड्यात काढतात. असाे, आपण ज्ञानाेबा-तुकाेबांची विचारसरणी जाेपासणारे असल्याने याेग्य त्या देवाणघेवाणीबद्दल आपणाला वेगळे सांगण्याची गरज भासणार नाही. कारण ज्ञानाेबा-तुकाेबांच्या प्रत्येक ओवी-अभंगातून आपण याेग्य आचार-विचारांची देवाण-घेवाण करीतच आहाेत. जय जय राम कृष्ण हरी.
-डाॅ. विजयकुमार पं. फड, श्री माऊली निवास, श्री माऊलीनगर, जालना माे. 9422216448
Powered By Sangraha 9.0