जगातील सर्वांत घाणेरडा इसम अमाैहाजीचा वयाच्या 94 व्या वर्षी अखेर मृत्यू झाला. अमाैहाजी हा इराणी नागरिक हाेता. त्याला पाण्याची भीती वाटत हाेती. त्यामुळे त्याने 50 वर्षे आंघाेळच केली नव्हती.इराणमधील देजगाह या गावात त्याचे गेल्या रविवारी निधन झाले. पण सरकारने मंगळवार 1 नाेव्हेंबर 2022 राेजी त्याच्या मृत्यूची पुष्टी केली.गावातील लाेकांनी गेल्याच महिन्यात हाजीला बळजबरीने आंघाेळ घालण्यासाठी बाथरूममध्ये नेले हाेते; पण ताे पळून गेला हाेता. सडलेले मांस खाणे त्याला आवडत हाेते. स्वच्छतेविषयी त्याला घृणा वाटत हाेती. मी आंघाेळ केली तर आजारी पडेन, अशी धास्ती त्याला वाटत हाेती. इराणी मीडियाने दिलेल्या माहितीनुसार 2013 मध्ये अमाैहाजीच्या जीवनावर ‘द स्ट्रेंज लाईफ ऑफ अमाैहाजी’ नावाची शाॅर्ट डाॅ्नयुमेंटरी तयार करण्यात आली हाेती.