झाड, प्राणी व मनुष्य या तिघांमध्ये एक मूलभूत फरक आहे. झाडाजवळ गती नाही आणि दिशाही नाही. प्राण्याजवळ गती आहे; पण दिशा नाही आणि मनुष्याजवळ मात्र गतीही आहे व दिशाही.मनुष्य हा देव अथवा प्राणी या दाेहाेंपैकी काहीही बनण्याची शक्यता जास्त आहे. वर चढण्यासाठी जी शिडी उपयाेगी ठरते, त्याच शिडीने खालीही उतरता येते. मनुष्य सत्कर्म करत वर चढत राहिला, तर देव बनू शकेल; पण कुकर्मापाेटी त्याच वेगाने खाली पडून पशूही बनू शकेल.