माेहाेराच्या संगें । सुख नव्हे आगीजाेग

28 Nov 2022 19:52:32
 

saint 
इकडे-तिकडे पडलेला दगड जेव्हा मंदिराला किंवा मंदिराच्या पायरीला लागताे तेव्हा ताे पवित्र हाेताे. या दगडावर पूर्वी पाय देणारे लाेक आता याच दगडापुढे नतमस्तक हाेतात. हा त्या दगडाला लाभलेल्या मंदिराच्या सहवासाचा परिणाम हाेय. या दगडाप्रमाणे इकडे-तिकडे भटकणारे, चुकीच्या मार्गावर चालणारे, लाेक जेव्हा संत, सज्जनाच्या सहवासात येतात, तेव्हा तेही सज्जनाप्रमाणे कांही प्रमाणात का हाेईना चांगुलपणास पात्र हाेतात.एखादा दुर्जन वाईट भावनेने जरी ज्ञानाेबा-तुकाेबाच्या दिंडीत गेला तरी इतर लाेक त्याच्या पाया पडू लागतात.आपण पात्र नसतानाही लाेक संताप्रमाणे आपल्यासमाेर नतमस्तक हाेत आहेत, हे लक्षात येऊन ताे स्वत:ला लाजताे आणि काही प्रमाणात का हाेईना सुधारताे. मुळात काेणी वाईट नसताे.
 
चुकीच्या मार्गावर जाणाऱ्याला सुधारावेच वाटत नाही, असे नाही. वाटमारी करणारा वाल्याकाेळी नारदांच्या सहवासाने महर्षि पदाला पाेहाेचला.राक्षस कुळात जन्मलेला बिभिषण प्रभू रामचंद्राच्या सहवासाने महात्मा झाला. समाजातही असे अनेक लाेक आहेत की जे पूर्वाश्रमी अत्यंत वाईट वागत हाेते. पण पुढे चालून चांगल्या व्य्नतीच्या सहवासाने ते चांगले बनले.
जय जय राम कृष्ण - डाॅ. विजयकुमार पं. फड श्री माऊली निवास, श्री माऊली नगर, जालना माे. 9422216448
Powered By Sangraha 9.0