गीतेच्या गाभाऱ्यात

28 Nov 2022 19:44:34
 
 
पत्र एकाेणतीसावे
 

bhagvatgita 
 
प्रिय जानकी, तुझे पत्र पावले.संत नामदेवांचे चरित्र मी नुकतेच वाचले हाेते.कित्ना थंबाल ले थंबाल आपुल्या गाई आमी दाताे घलाला भाई या पं्नती माझ्या ओठावर नाचत हाेत्या.नामदेवांचे चरित्र वाचून झाल्यावर मी सूरदास वाचत हाेताे.मैया माेरी मै नही माखन खायाे सूरदास तब विहँसि जसाेदा लै उरिकंठ लगायाे या पं्नती वाचून माझ्या अंतरंगात आनंदाची सूक्ष्म तार छेडली जात हाेती. अशा वेळी तुझे पत्र आले. तू आपल्या पत्रांत लिहितेस- ‘तुम्ही एकदा प्रवचनात म्हणाला हाेता-’ श्रीकृष्णासारखा सर्वताेपरी महान पुरुष जगात अद्याप झाला नाही. कांटने म्हटले आहे की, तत्त्वज्ञ लाेक नीतीला पुरुषाचा वेष चढवतात पण असा पूर्ण पुरुष झाला नाही. कांटच्या ह्या म्हणण्याला पुस्ती जाेडून व त्यात दुरुस्ती करून असे म्हणावे लागेल की असा पूर्ण पुरुष म्हणजे श्रीकृष्ण.
 
कृष्णाचे शत्रू प्रत्यक्ष असूर नसून जगात दिसणारी आसुरी स्वभावाची माणसे त्याच्या शत्रुस्थानी हाेती. रामाप्रमाणे त्यास प्रत्यक्ष राक्षसांच्या बराेबर लढावयाचे नव्हते. किंवा त्याचे साहाय्यकर्ते वानर नव्हते. दुष्ट दुराचारी माणसांना या जगात बुद्धी व पराक्रम ह्यांचे पाठबळ मिळते अशा लाेकांशी नीतीमान माणसाने कसे वागावे ही जीवनातील एक महान समस्या आहे. दादाेबांच्या व्याकरणात पहिले वा्नय असे आहे.शुद्ध कसे बाेलावे व शुद्ध कसे लिहावे हे व्याकरण शिकल्याने समजते. ह्याच चालीवर असे म्हणता येईल की बुद्धिमान व पराक्रमी पण पापी व दुष्ट माणसाशी कसे बाेलावे व कसे वागावे े श्रीकृष्ण चरित्र वाचल्याने समजते.ज्याला गीता समजून घ्यायची आहे त्याने श्रीकृष्ण चरित्र जरूर समजून घेतले पाहिजे.
 
तुम्ही मला श्रीकृष्ण चरित्र थाेड्नयात सांगा. मात्र अंधभ्नतीच्या चष्म्यातून न सांगता बुद्धिवादाच्या चष्म्यातून सांगा व ते सांगतांना कृष्णावर निरनिराळ्या विद्वानांनी जे आक्षेप घेतले आहेत त्यांचे निराकरण करा.गीतेच्या गाभाऱ्यात मला कळेल अशा तऱ्हेने तुम्ही जे सांगता त्यामुळे माझे जीवन उच्च, उदात्त व उत्तुंग हाेण्यास फार मदत हाेतआहे.तरी ह्या खेपेत तुम्ही मला थाेड्नयात कृष्ण चरित्र सांगा आणि माझे जीवनपुष्प सुगंधित करा.’ तुझा विचार चांगला आहे गीता समजजून घेण्यास श्रीकृष्णाचे चरित्र समजून घेणे जरूर आहे. प्रभु रामचंद्र देवाचा अवतार हाेते, पण ह्या अवतारात ज्ञानाचा उपदेश भगवानांनी स्वमुखाने केला नाही. श्रीकृष्णाने गीतेच्या रूपाने असा काहीदिव्य उपदेश केला आहे की, इतका सर्वाेत्कृष्ट उपदेश आजपर्यंत काेणी केला नाही. आज जगात जे ग्रंथ आहेत त्यामध्ये तत्त्वज्ञानाच्या प्रांतात पहिला मान अथवा अंगुलीस्थान गीताग्रंथाला दिले जाते. श्रीकृष्णाने जन्मभर जे तत्त्वज्ञान आचरून दाखवले त्याचे सार म्हणजे गीताग्रंथ.
 
अशा परिस्थितीत गीताग्रंथ समजून घेण्यास श्रीकृष्णाचे जीवन समजून घेणे आवश्यक आहे. मथुरेचे मूळचे नाव मधुपुरी असे हाेते, कारण ही नगरी मधु राक्षसाने वसवली हाेती. पुढे मधुचा पुत्र लवण ह्यास रामाचा भाऊ शत्रुघ्न ह्याने ठार मारले. श्रीकृष्णाचा जन्म हाेण्यापूर्वी उग्रसेन नावाचा राजा मथुरेत राज्य करत हाेता. ह्याचे नाव उग्रसेन असले तरी स्वभावाने ताे फार साैम्य व दयाळू हाेता.
साैम्यसेन हे नाव त्यास शाेभले असते. त्याचा पुत्र कंस हा मात्र फार ऊग्र व दुष्ट हाेता. सम्राट जरासंधाच्या दाेन मुली अस्ति व प्राप्ति ह्या कंसास दिल्या हाेत्या. त्याने आपला बाप उग्रसेन ह्यास कैद करून औरंगजेबाप्रमाणे राज्य बळकावले व ताे मन मानेल तसा वागू लागला.
Powered By Sangraha 9.0