वायू प्रदूषणात बिहारमधील शहरांनी दिल्लीला मागे टाकले

26 Nov 2022 12:39:58
 
 

Pollution 
 
राज्याच्या तेरा शहरांतील ‘ए्नयूआय’ धाेकादायक पातळीवर असल्याची ‘सीपीसीबी’ची माहिती आराेग्यासाठी हिवाळा हा उत्तम काळ असला, तरी हवा स्वच्छ नसेल तर त्याचा उपयाेग हाेणार नाही. वाहने आणि उद्याेगांच्या वाढत्या संख्येमुळे हवेचे प्रदूषण वाढत चालले असून, या काळात उत्तर भारताच्या मैदानी प्रदेशात वाढणाऱ्या हवेच्या प्रदूषणाच्या बातम्या झळकायला लागतात.दिल्लीसह काही शहरे त्यासाठी कुप्रसिद्ध आहेत. मात्र, या शहरांपेक्षाही जास्त प्रदूषण बिहारमधील लहान शहरांमध्ये हाेत असल्याचे केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या (सीपीसीबी) आकडेवारीतून स्पष्ट झाले आहे. लाल आणि गडद लाल या रंगांद्वारे अत्यंत प्रदूषित शहरे दर्शविली जातात.
 
त्यांच्या यादीवर नजर टाकली, तर देशभरातील वायू प्रदूषणात माेठा हिस्सा बिहारमधील शहरांचा असल्याचे दिसेल. ‘नॅशनल सेंटर फाॅर डिसीज कंट्राेल’ (एनसीडीसी) या संस्थेकडूनसुद्धा या संदर्भात काही माहिती मिळाली आहे.हवेची शुद्धता ‘एअर क्वालिटी इंडे्नस’द्वारे (ए्नयूआय) माेजली जाते.‘सीपीसीबी’कडून साेमवारी सकाळी दहा वाजता मिळालेली आकडेवारी ‘एनसीडीसी’ने प्रसिद्ध केली असून, त्यात देशातील सर्वाधिक प्रदूषित शहरांत बिहारमधील अनेक शहरांचा समावेश आहे.त्यात बेगुसरायमध्ये 379, ब्नसरमध्ये 378, छपरामध्ये 316, दरभंगामध्ये 354, कटिहारमध्ये 327, पाटण्यात 322, पूर्णियामध्ये 317, सहरसामध्ये 327 आणि समस्तीपूरमध्ये 357 ‘एअर क्वालिटी इंडे्नस’ची नाेंद केलेली असून, ही सर्व शहरे ‘रेड झाेन’मध्ये आहेत.
 
‘सीपीसीबी’च्या या यादीत देशभरातील 167 शहरांचा समावेश असून, त्यातील तेरा शहरे ‘रेड झाेन’मध्ये आहेत आणि त्यातील नऊ शहरे बिहारमधील आहेत.यातून तेथील प्रदूषणाचे गांभीर्य लक्षात येते. राजधानी नवी दिल्लीसह मध्य प्रदेश आणि महाराष्ट्रातील प्रत्येकी एका शहराचा यादीत समावेश आहे. ‘रेड झाेन’मध्ये दिल्ली (316), जबलपूर (308), पुणे (302) आणि सिंगराैली (301 ए्नयूआय) ही शहरे आहेत.आंतरराष्ट्रीय निकषांनुसार प्रदूषणाचे वर्गीकरण सहा श्रेणींमध्ये केले जाते. 0 ते 50पर्यंत ‘ए्नयूआय’ असलेली शहरे हिरव्या रंगात दाखविली जातात. हे क्षेत्र जाेखमीचे असते. 51 ते 100 ‘ए्नयूआय’ असलेली शहरे फ्निया हिरव्या रंगात दाखविली जातात आणि हे क्षेत्र थाेडे चिंताजनक मानले जाते. पिवळा रंग जास्त चिंतेचा असून 101 ते 200 ‘ए्नयआय’ असलेली शहरे याद्वारे दर्शविली जातात.बिहारच्या सर्व जिल्हा मुख्यालयांची स्थिती यापेक्षा वाईट आहे.
Powered By Sangraha 9.0