ओशाे - गीता-दर्शन

26 Nov 2022 12:37:43
 
 

Osho 
 
कारण आपण जर आपल्यावर प्रेम केलं असतं.तर आज जी जगाची दुर्दशा आहे ती झाली असती काय? आपलं जर आपणावर प्रेम असतं तर माणसे वेडी झाली नसती, त्यांना आत्महत्या केल्या नसत्या. आपलं जर आपणावर प्रेम असतं तर जगात मानसिक राेगाचं एवढं थैमान माजलं नसतं.चिकित्सक म्हणतात की, आज सुमारे सत्तर ट्नके राेग मानसिक असतात. हे सर्व राेग उद्भवतात.केवळ एका गाेष्टीमुळे. अन् ती म्हणजे स्वत:चा तिरस्कार. आपण सगळे स्वत:चा तिरस्कार करीत असताे. हजाराे प्रकारे स्वत:ला सतावत असताे.स्वत:ला समावण्याचे नवनवे हजाराे मार्ग राेज आपण हुडकून काढत असताे. स्वत:ला ्नलेश व दु:ख देण्यासाठी जणू आपण टपलेलेच असताे म्हणाना. त्यासाठी नवनव्या व्यवस्था आपण करीत असताे. पण हे काम आपण माेठ्या तर्कपूर्ण पद्धतीने करत असताे.
 
चिकित्सक म्हणताहेत की सत्तर ट्नके राेग माणूस स्वत:ला सजा देण्यासाठीच विकसित करीत असताे. तर तिकडे मानसशास्त्रज्ञ म्हणत आहेत की आत्ता हा आकडा छाेटा आहे, अंडर एस्टीमेशन आहे. खरा आकडा आणखीनच माेठा आहे. खरा आकडा हुडकला तर आपल्याला असेच म्हणावे लागेल की नव्याण्णव ट्नके राेग म्हणजे माणसाने अजाणतेपणे स्वत:ला शिक्षा देण्यासाठी हुडकलेले मार्ग आहेत.इतका तिरस्कार आहे स्वत:शी, स्वत:बद्दलचा. हा तिरस्कार आपल्या प्रत्येक कृत्यात दिसून येत असताे. एक गाेष्ट लक्षात ठेवली तर ती कसाेटी सारखी वापरता येईल. काेणतेही काम करण्याआधी आपण स्वत:ला असं विचारायचं की यामुळे मला सुख मिळेल का दु:ख?
Powered By Sangraha 9.0